पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पहिले ‘पासच्या कांहीं गांवांच्या जोसपणाच्या व कुळकरणपणाच्या वृत्ति संपादन केल्या आणि पंतांच्या नंतर त्यांच्या एकावा व भुतावा या मुलांनातवांनी हि कांहीं वृत्ति विकत घेतल्या. या तिघांपैकी कोणी कोणती गांवें मिळविली याचा नक्की शोध अद्यापि लागत नाहीं. तत्कालीन आवश्यक ते शिक्षण एकावा व भुतावा यांना मिळाले होते, हे येथे निराळे सांगण्याची विशेष जरूरी नाही. त्या काळी जरी मुसलमानी अमल महाराष्ट्रांत सुरू झाला होता, तरी राज्ययंत्र चालविण्यास बहुतेक हिंदूंची च मदत घेतली जात असे. लष्करी खात्यांत मुसलमानांचा भरणा जितका भरपूर असे, तितका मुलकी खात्यांत नसे. याचे कारण उघडच होते: स्वतःचे राज्य टिकविण्यासाठीं तत्कालीन मुसलमान पादशाहांना आपल्या जातभाईची गरज अवश्य वाटत असे. मुलकी खात्यांतील बहुतेक पोटखात्यांत, विशेषतः हिशेबी पोटखात्यांत ब्राह्मणांचाच भरणा पुष्कळ होता. गांवांचे कुळकरण तर ( थोडेसे अपवाद सोडल्यास ) ब्राह्मणांच्याकडे पिढ्यान् पिढ्या चालत आले होते; खेरीज ते गांवगाड्यांतील एक विशिष्ट अंग होते. त्यामुळे वर सांगिल्याप्रमाणे निरनिराळ्या राज्यकर्त्यांनी त्यांत फेरफार करण्याचा जोराचा प्रयत्न केला नाही. यासाठी कुळकरण ( व इतर वृत्ति ) चालविण्याचे शिक्षण त्या वृत्तिवंतांच्या घराण्यांत आनुवंशिक मिळत असे; त्यास अनुसरून हे शिक्षण गोविंदपंतांनी आपल्या मुलास व नातवास दिले असणे साहजिक आहे. गोविंदपंतांनी कुळकरण व जोसपण या वृत्ति इकडे आल्यानंतर जरी मिळविल्या तरी तेवढ्या काळांत आपल्या मुला-नातवांस शिक्षण देण्यास त्यांना विशेष अडचण पडली नाहीं. ९. अठरा गांवांच्या वृत्त. | ( भुतावांची कार्यव्याप्ति. ) गोविंदपंतांचे नातू भुतावा ह्यांच्या वेळी पानसे यांच्याकडे बालाघाट प्रांतांतील अठरा गांवांच्या ज्योतिष व कुळकरण यांच्या वृत्ति होत्या असा उल्लेख एका (आमच्या संग्रहांतील ) जुन्या टिपणांत आढळतो. मागे सांगितल्याप्रमाणे दुर्गादेवाच्या दुष्काळाचा फायदा घेऊन या १८ गांवांपैकी कांहीं गांवांच्या वृत्त गोविंदपंत, एकावा व भुतावा यांनी प्रथम खरेदी केल्या व बाकीच्या गांवांच्या वृत्ति पुढे सवडी सवडीनें संपादन केल्या. या वृत्ति पुढे वंशपरंपरेनें कांहीं काळपर्यंत त्याच घराण्यांत चालत होत्या. हीं अठरा गांवे पुढील प्रमाणे:- १ बाभूळगांव बुद्रुक ३ बाभूळगांव खुर्द ३ विटफूट ४ मांडवें ५ आळेगांव ६ पारे ७ पाटोदे ८ पालवण ९ नांदुरे १० पारगांव मोटेचे ११ एलंब १२ चौसाळे १३ वाढवण १४ पिंपळगढी तेल्याची १५ पाथरी उर्फ पाथेर १६ निंब गणेशाचे १७ शिवगण आणि १८ खातरें. " हीं बहतेक सर्व गांवें सांप्रत निजाम हैद्राबाद संस्थानांत असून, त्यांपैकी पहिली