पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास. निजामच्या राज्यांतील या बालेघाटांत पूर्वी एकंदर ३१ महाल होते असे भारतवर्षांत आलेल्या एका उल्लेखावरून समजते. वालेघाटांत पाथरी व माहूर हे दोन सरकार होते. पाथरी सरकारांत १ हवेली ( पाथरी ) २ वालूर ३ परभणी ४ नाचण गांव ५ भोगांव ६ टाकळी ७ झरी ८ कौसाडी ९ रोवली १० लाखणगांव व ११ जिंतूर असे अकरा महाल होते. माहूरसरकार यांत १ हवेली ( माहूर ) २ अनसिंग ३ खेड ४ भिंगाली ५ पुसद ६ तामसे ७ चिपोली ८ चिकणी ९ दारभण १० टोकी ११ सोहते १२ नांदापूर १३ सिंदखेड १४ सटाळे १५ गिरोली १६ मोहगीर १७ किव्हाटे १८ हळद १९ वाढवण व २० कन्हाटे असे वसि महाल होते. ८. गोविंदपंतांचे वृत्ति-संपादन, | महाराष्ट्रांत वृत्ति ( वतन ) ही संस्था फार प्राचीन आहे. कै० वि. का. राजवाडे यांनी आपल्या * महाराष्ट्राचा वसाहतकाल ' या अत्यंत विद्वत्ताप्रचुर व संशाधनात्मक निबंधांत या संस्थेचा इतिहास दिला आहे. त्यांत त्यांनी असे सिद्ध केले आहे कीं आर्यानीं नर्मदोत्तर भारतवर्ष सोडून व विंध्य ओलांडून दण्डकारण्यांत ऊर्फ भावी महाराष्ट्रांत ज्या वेळीं वसाहती केल्या, त्या वेळी या वृत्ति त्यांनीच उत्पन्न केल्या. वसाहतकर्म चालू असतां त्या वसाहतीचे ऐहिक व पारलौकिक भरणपोषण करण्यासाठी निरनिराळ्या जातीतील अधिकृत व स्वतंत्र व्यक्तींची ऊर्फ कारूंची गरज भासू लागली. त्यामुळे अशा व्यक्ति निवडून काढून त्यांच्याकडे ती ती कामे सोपविण्यात आली आणि त्याबद्दल त्यांच्या पदरीं ह्या वृत्ति बांधल्या. त्यामुळे त्यांना चरितार्थ चालावण्यास अडचण पडली नाहीं व वसाहतींचेहि हे कार्य बिनबोभाट चालू लागले. सारांश, गांवगाड्यांतील अलुते, बलुते किंवा कारू नारू यांची व त्यांच्या वृत्तींची उत्पात्त ही अशी आहे. । अशा बलुतेदारांची सामान्य संख्या वारा असते. त्यांत प्रांतभेदाने थोडाफार फरक पडतो. या बारा बलुतेदारांत जोसपणा व कुळकरण ही कामे करणारे जोशी व कुळकर्णी हे येतात. या वृत्तांवर सरकारचा ताबा नसे. कारण, सरकार ( ऊर्फ राजशासन) ही संस्था वृत्तसंस्था स्थापन झाल्यानंतरची आहे. त्यामुळे निरनिराळी सरकारें ऊर्फ राजवटी आल्या किंवा गेल्या तरी वृत्तींना अपाय होत नसे व वृत्तिवंतांवर कठिण प्रसंग (म्हणजे वृत्तिच्छेदन ) गुदरत नसे. अस्मानी सुलतानी कोसळली तर एवढे च होई की उपाशी पोटाचा वृत्तिवंत आपले पोट भरण्यासाठी दुसयाजवळ आपली वृत्ति गहाण ठेवी, किंवा अगदी निरुपाय च झाल्यास विकी. दुष्काळासारख्या व सरकारी जुलुमासारख्या प्रसंगी अशा गोष्टी घडत असत. अशा वेळी ह्या वृत्ति थोडक्या रकमेत विक्रीस निघत. दुर्गादेवीचा दुष्काळ तर अशा प्रसंगांपैकी एक मोठा प्रसंग होता. त्याचा फायदा घेऊन बरोबर आणलेल्या पैक्याचा उपयोग करून गोविंदपंतांनी पाथरीच्या आस