पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| प्रकरण पहिले. प्रक ७ कडे येत असत. त्याच वेळी दुर्गादेवीच्या दुष्काळाचा प्रसंग येऊन ठेपला. दुष्काळापूर्वी एक दोन वर्षे वाळंभटांनी पुढे भयंकर दुष्काळ पडणार आहे, बारा ( १ सात ) वर्षात धान्याचा कण दृष्टीस पडणार नाही, त्यामुळे गुराढोरांचा व माणसांचा फार संहार होईल असे भविष्य वर्तविले आणि त्यावर तोड म्हणून असे सागिंतलें कीं, आतां पासून एक दोन वर्षात जेवढा धान्यसंग्रह करून ठेवणे शक्य असेल, तेवढा संग्रह लोकांनी वेळीच वरून ठेवावा आणि मग तो पुढे अवर्षणाच्या बारा वर्षांपर्यंत पुरवावा. बाळंभटाच्या भविष्यावर लोकांचा विश्वास असल्याने पायरीच्या आसपासच्या प्रांतांतील बहुतेक सर्व लोकांनी जवळ जवळ बारा वर्षे पुरेल इतका धान्याचा संग्रह करून ठेविला होता. त्या मुळे त्या प्रांतांत दुर्गादेवीचा दुष्काळ तितकासा जाणवला नाहीं; ही हकीगत शेजारच्या प्रांतांत पसरल्यामुळे तेथील दुष्काळ पीडित लोक पाथरी परगण्यांत धनधान्यवंतांच्य आश्रयास येऊन राहिले. याच कारणाने पानसे यांचे मूळपुरुष मशारनिल्हे गोविंदपंत हे ह्या प्रांती आले. दुष्काळ संपल्यावर ही बातमी बेदरच्या बादशहास समजली, तेव्हां त्यास मोठा आनंद होऊन त्याने बाळंभटास बेदरास बोलावून नेऊन त्यांचा मोठा गौरव केला आणि त्यांना कांहीं जहागीर हि देण्याची इच्छा दर्शविली. पण दामाजीपंताप्रमाणे बाळंभटांनीं जहागीर स्वीकारण्याचे नाकारले ( याच दुष्काळांत मंगळवेढ्याचे ठाणेदार दामाजीपंत यांची धान्य लुटविल्याची हकीकत घडली होती व त्या वेळचा तोच वेदरचा बादशहा बाळंभटांना जहागीर घेण्याबद्दल आग्रहकरीत होता; हें बहुश्रत वाचकांच्या ध्यानांत आलेच असेल ) ! त्या निस्पृह बाळंभटानी वादशहास सांगितले की, जहागीर घेण्याजोगे महत्त्वाचे असे कोणतेच कार्य मी केलेलें नाहीं, भविष्य वर्तविण्यांत फक्त मी माझे कर्तव्य तेवढे बजाविले आहे. अर्थात् त्या बद्दल पारितोषिक स्विकारणे हा माझा धर्म नाहीं. बादशहाने पुष्कळ आग्रह केला, पण त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं. अखेर बादशहाने त्यांतले त्यांत एक निराळीच तोड काढली. पाथरी गांव ज्या प्रांतांत होते या प्रांतास बाळंभटाच्या स्मरणार्थ तेव्हां पासून * बालाघाट " हे नांव द्यावे असे त्याने फर्मान सोडले आणि त्यामुळे त्यावेळेपासून आजमितीपर्यंत त्या टापूस ‘बालाघाट' हे नांव चालू राहिले आहे; अशी दंतकथा आहे. । | बेदरचा बादशहाः-या वेळीं बहामनी वंशांतलि राजाचा ताबा या प्रांतावर होता. या राजघराण्याची मुख्य राजधानी कलबुर्गा येथे होती. पुढे बहामनीशहा या राजाने शके १३५४ त बेदर शहर वसावले व तेथे तो दरबार भरवू लागला. यामुळे बेदरचे राज्य असा बोलण्याचा परिपाठ पडला. दुर्गादेवी दुष्काळाच्या वेळी बहामनी वंशांतील महंमदशहा [ दुसरा ] हा बादशहा राज्य करीत होता. बहामनी राज्याचे पांच तुकडे होऊन त्यांपैकी बेदरचे निराळे राज्य शके १४१४ मध्ये स्थापिलें. गेले.