पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास. नातू भूतावा हे ही होते. एकावा हे गोबिंदपंताचे एकुलते एक चिरंजीव होते. इकडे आल्यानंतर थोड्या दिवसांनी गोविंदपंत निवर्तले. या एकंदर हकीगतीवरून गोविंदपंत बालेघाटी जेव्हां आले, तेव्हां त्यांचे वय ( नातवासह तीन पिढ्या जमेस धरून ) निदान ६५ वर्षांचे असावे असा अजमास बांधल्यास तो फारसा चुकणार नाहीं. शके १३९० च्या सुमारास गोविंदपंत हे जवळ जवळ ६५।७० वर्षांचे होते असे दुस-या हि एका प्रमाणावरून सिद्ध होते. | मागे आपण ठरविले आहे की, लक्ष्मीधर हे शके १५२७ च्या पूर्वी विद्यमान असून त्यांचा जन्म १५०० च्या सुमारास झाला असावा. मशार निल्हे गोविंदपंतांपासून हे लक्ष्मीधर नववे पुरुष आहेत. ( परिशिष्ट वंशावळ पहा ). दर पिढीस वसि वर्षे ही ऐतिहासिक कालगणना ध्यानांत धरून गोविंद पंताचा काल काढल्यास तो (१५००-१८० = ) शके १३२० चा येतो, म्हणजे शके १३२० मध्ये गोविंद पंतांचा जन्म धरल्यास शके १३९० मध्ये त्यांचे वय ७० वर्षांचे होते असे सिद्ध होते, आणि वर आम्हीं जो अनुमानाने त्यांचा काल ठरविला होता त्यास ह्या ताळ्या.. मुळे पुष्टि च मिळते. सारांश, ही गोष्ट ध्यानांत घेतल्यास पानसे यांची आज सर्वांत जुनी माहिती शके १३२० पासूनची मिळू शकते. अस्तु. ७, बालेघाटाची दंतकथा. वाला ( वरला ) घाटाचा रूढ अर्थ आम्हीं वर दिलाच आहे आणि तो सामान्य पणे खरा हि आहे. तथापि,ह्या नांवाबद्दल पाथरीकडील म्हणजे याबालाघाटांतील प्रांतांतच एक दंतकथा प्रचलित आहे, ती येथे देतो. दंतकथा अगदी टाकाऊ असतात असे एक मत विद्वान् लोकांत रूढ आहे हे आम्हांस ठाऊक आहे; पण आम्हांस मात्र तें सर्वस्वी ग्राह्य वाटत नाही. दंथकथेत स्थूलरूपाने ऐतिहासिक सत्य असते, म्हणजे तिचा. पाया ऐतिहासिक असतो व मग वरील इमारत मात्र कदाचित् बरीच भर टाकून सज-- विलेली असू शकेल असे आमचे मत आहे. पराचा कावळा होण्यास मूळ ठिकाण निदान पंखाचे तरी अस्तित्व असणे भाग आहे. शास्त्रकारांनी दंतकथांस प्रामाण्याची योग्यता दिल्याचे न्यायशास्त्रकार प्रशस्तपादाचार्य न्यायभाष्यांत सांगतात. “ऐतिह्यमप्यविनथेमाप्तोपदेशएव' प्रमाणम्; या साठी ऐतिहासिक दंतकथा तरी ' ह्या खोट्या असतात' अशा सबबीवर विद्वान् मंडळींनी अगदी त्याज्य ठरवू नयेत अशी आमची त्यांना विनंति आहे. भुसांतून पांखडून ज्याप्रमाणे धान्याचे कण काढतां येतात त्या प्रमाणे चिकित्सेची दृष्टि लावून अशा दंतकथांचा उलगडा' अधिकारी पुरुषांना करतां येण्याजोगा आहे. असो. बालेघाटाची दंतकथा पुढीलप्रमाणे आहेः पाथरी येथे बाळंभट या नांवाचे एक ज्योतिषी रहात होते. ज्योतिषशास्त्रांत त्यांची प्रगति चांगली असून त्यांचा लौकिक आसपासच्या प्रांतांत दूरवर पसरला होता आणि त्या प्रांतांतील अनेक लोक अनेक प्रसंगी ज्योतिषविषयक सल्ला घेण्यास त्यांच्या--