पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पहिले. असो. या पुढील लक्ष्मीधरापर्यंतची माहिती, पानगांव तालुके बार्शी जिल्हा सोलापूर येथे जें पानसे यांचे जुने दफ्तर आहे त्यांतून घेतली आहे; या दफ्तरांत थोडेसे जुने कागदपत्र शिल्लक राहिले आहेत; बाकी पुष्कळसे कागद निरनिराळ्या कारणांनी नष्ट झाले. अस्सल कागदपत्र कसे नाहीसे झाले याचे एक उदाहरण दुर्दैवाने येथे नमूद केल्याशिवाय आमच्याने राहवत नाही. एका गांवी आम्ही जुने कागदपत्र पाहण्यास गेलो असतां असें नजरेस आलें कीं, कांहीं दप्तरें व पुष्कळसे सुटे कागद एका दाणे सांठविण्याच्या कणगींत खच्चून दाबून भरले होते. ते बाहेर काढतांना त्यांतून विंचू, झुरळे व इतर जातीचे बरेच किडे बाहेर निघाले. कांहीं कागदांचा अगदी बारीक झालेला चुरा हि, घमेली दोन घमेली कणगीत निघालो. अशा रीतीने कागदपत्रांची अनास्था झाल्यामुळे जुने लेख फार च दुर्मिळ झाले आहेत. याच कागदांत एक यादी सांपडली. तिचा आरंभ असा आहे, “पानसी यांच्या कुलवृत्ती, वंशावळी, शके १६६२ रौद्रनाम संवत्सरे, अस्सल बरहुकुम नक्कल केली, सुरू सन ११५० " गणिताप्रमाणे शके १६६२ ला रौद्रसंवत्सर येतो; पण सुरू सन ११५० न येतां ११४० येतो. तेव्हां ११५० जो दिला आहे तो फसली सनाचा आहे म्हणजे “ सुरू सन” या ऐवजी फसली सन असे लिहावयास पाहिजे होते ( परकी सनांच्या गैर माहितगार लेखकाचा हा प्रमाद आहे ). वरील उताच्यावरून ही यादी पूर्वीच्या दुस-या एका अस्सल यादीवरून नक्कल केलेली आहे असे सिद्ध होत असल्याने तिला विश्वसनीय धरण्यास हरकत नाही. ही यादी खंडो शिवदेव यांच्या वेळची असली पाहिजे असे यादीच्या शकावरून च उघड होत आहे. ६. गोविंदपंतांचे पाथरस आगमन. या दुष्काळांत पानसे यांचे मूळपुरुष गोविंदपंत (पहिले) [वतनपत्र पांचव्यांत उल्लेखिलेले खंडोपंताचे आजे ' गोविंद विश्वनाथ ' ह्यांस आपण गोविंदपंत ( दुसरे ) असे म्हणू . ] हे कर्नाटक सोडून सोलापूर जिल्ह्या जवळल ( सांप्रत निजामच्या राज्यांतील बीड जिल्ह्यांत असलेल्या ) पाथरी गांवीं आले, व तेथे त्यांनी वसति केली ( शके १३९० ). त्यावेळी पाथरी हा परगणा होता व तो परगणा ज्या प्रांतांत होता त्या प्रांतास बालाघाट हे नांव होते. बालाघाट याचा सामान्य अर्थ * घाटावरलि प्रदेश उर्फ घाटमाथा' असा आहे. याप्रमाणे नर्मदेच्या अलीकडे दाक्षिण हिंदुस्थानांत असे चार बालेघाट आहेत. पैकी पहिला व-हाडांतील अजिंठ्याचा घाटमाथा दसरा नागपूर प्रांतांतील, तिसरा हैद्राबाद निजाम संस्थान व सोलापर जिल्हा यांच्या मधील व चौथा म्हैसूर संस्थान आणि बल्लारी, कडाप्पा, अनंतपुर, कर्नुल यांच्या ईशान्येकडील होय. या चारांपैकी तिस-या बालाघाट प्रांतांत वरील पाथरी हे गांव होते. गोविंदपंत इकडे आले तेव्हां त्यांचे सर्व कुटुंब त्यांच्या बरोबर च होते. कुटुंबांत त्यांचा पुत्र एकावा व एकावाचा पुत्र म्हणजे च त्यांचा