पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास. ५. पानशांचे महाराष्ट्रांत आगमन. पानसे हे मूळचे कर्नाटकांतील रहिवासी होते. या गोष्टीस आज प्रत्यक्ष लेखी आधार आढळत नाहीं; तथापि आमच्या अनुमानास एक अप्रत्यक्ष परंतु लेखी आधार सांपडतो. जी पहिली पानसे मंडळी कर्नाटकांतून इकडे महाराष्ट्रांत वस्तीस आली, त्या मंडळींची नांवें लिहिण्याच्या पद्धतीवरून याचा निर्णय होतो. त्यांनी आपल्या नांवांच्या शेवटी " वा " हा प्रत्यय लाविलेला आहे. कानडींत हा “वा” * आप्पा' या अर्थाने बहुमानार्थी लावीत असावेत. कर्नाटक व महाराष्ट्र यांच्या सीमेवर दोन्ही भाषा प्रचारांत असल्याने असा महाराष्ट्रकन्नडमिश्रित एकत्र शब्दसंघटनेचा चमत्कार चालू असणे यांत मोठेसे आश्चर्य नाही. त्या प्रांतांतील त्या वेळची जुनी कागदपते पाहिली असतां ही गोष्ट प्रत्ययास येईल. अशा कागदपत्रांतून ही " वा प्रत्ययान्त नांवें पुष्कळ आढळतील. कर्नाटकांतून पानशांचा जो मूळ पुरुष महाराष्ट्रांत आला त्याच्या मुलाचे व नातवांची, नांवें अनुक्रमें एकावा, भुतावा आणि परसावा अशी होती. महाराष्ट्रांत स्थायिक होऊन तीन चार पिढ्या गेल्यानंतर या कानडी नांवांत फरक पडून इकडील महाराष्ट्रय नांवें या कुटुंबांत ठेवण्यांत येऊ लागली. कर्नाटकांत * एक' हे नांव फार रूढ आहे. तंजावरच्या भोंसले राजघराण्यांत हे नांव आपल्याला आढळून येईल. थोरले शहाजीराजे यांचे धाकटे पुत्र, ज्यांनी तंजावर येथे आपली गादी स्थापिली व जे शिवाजीमहाराज यांचे सावत्र भाऊ होते, त्यांचे खरें नांव में एकोजी, येकोजी असे च होते. मराठी बखरकारांनी एकोजीचें व्यंकोजी, केले आहे. सारांश, कर्नाटकांत येकोजी हे नांव फार रूढ आहे, एवढे च येथे सांगण्याचा आमचा मुद्दा आहे. - कर्नाटकांतील अनेक घराणीं गंगथडी किंवा भीमथडीच्या भागांत राहावयास येऊन सुमारे ४५० वर्षे झाली. स्वदेश सोडून परदेशांत जाऊन वस्ती करण्यास मुख्यतः दोन कारणे लागतात; एक अस्मानी किंवा दुसरें सुलतानी. अवर्षण, अतिवृष्टि, रोगांची, सांथ वगैरे कारणे अस्मानीत येतात, तर राजाचा जुलूम, अधिका-यांचा आततायीपणा इत्यादि कारणे सुलतानीत येतात. पहिला प्रसंग वर सांगितल्याप्रमाणे ४५० वर्षांपूर्वी कर्नाटकांत गुदरला होता. तो म्हणजे प्रसिद्ध “ दुर्गादेवी” चा दुष्काळ. हा दुष्काळ शके १३९० पासून शके १३९७ पर्यंत सारखा सात वर्षे पडला होता, असे कै. वि. का. राजवाडे यांनी सरस्वतीमंदिर या मासिकांत एका अस्सल कार वरून सिद्ध असल्याचे प्रसिद्ध केले आहे. या दुष्काळांत कर्नाटकांतील बरीचशी घराणीं महाराष्ट्रांत आली. महाराष्ट्रांत हि त्या वेळी या दुष्काळाचा परिणाम बरा च जाणवला होता. तथापि, कर्नाटकापेक्षां तो सौम्य स्वरूपाचा होता; त्यामुळे ही कानडी घराणी महाराष्ट्रांत येऊन राहिली. दंतकथा सांगते. कीं, हा दुष्काळ १२ वर्षांचा होता, पण आतां वर सांगितलेल्या कागदावरून तो ७ वर्षांचा होता असे सिद्ध, झाले आहे.