पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पहिले. देशस्थ ब्राह्मण होत; यांचे गोत्र मुद्गल असून त्याचे अंगिरस, भार्थ्यश्व, व मौद्गल्य असे तीन प्रवर आहेत; आश्वलायनाने अंगिरसाऐवजी तृक्ष याचे नांव दिले आहे. आज आम्हांस कागदपत्रांच्या पुराव्यानिशीं पानशांची ऐतिहासिक माहिती शा. शके १५०० पासूनची उपलब्ध झाली आहे. तत्पूर्वीची माहिती मात्र दंतकथांवरून एकत्र करावी लागत आहे. कै० वाड यांनी * वतनपत्रे, निवाडपत्रे वगैरे” म्हणून जें पुस्तक तयार केले आहे. त्यांतील “ वतनपत्र ५ वे " हे पानशांच्या च संबंधाचे आहे. हे अत्यंत मोठे असून, त्याने सदर पुस्तकाची १४ पृष्ठे व्यापिलीं आहेत; हैं। महत्त्वाचे असल्याने व त्यांतील माहितीचा आम्ही ठिकठिकाणी आधार घेतला अस ल्यामुळे ते सबंध वतनपत्र आम्ही आमच्या या पुस्तकाच्या शेवटीं परिशिष्टांत दिले आहे ( परिशिष्ट क्रमांक १ पहा ). हे वतनपत्र * शके ६८, दुर्मतिनाम संवत्सर, ‘फाल्गुन शुद्ध चतुर्दशी, मंदवासर, सुरु सन इसने अवैन मया व अलफ” या दिवशींचे आहे; यांतील ६८ हा ( शिवाजी महाराजांचा ) राज्याभिषेक शक असून, इसने अबैन मया व अलफ म्हणजे अरबी सन ११४२ हा होय; म्हणजे हे पत्र शालिवाहन शके १६६३ फाल्गुन शुद्ध १४ चे आहे. मोडकांच्या जंत्रीत या दिवशी मंदवासर म्हणजे शनिवार येत नसून मंगळवार येतो ( बहुधा वाडांच्या पुस्तकांत नजरचुकीने मंगळवाराऐवजी मंदवासर छापिले गेले असावें ). हे वतनपत्र खो शिवदेव पानसे यांस पेशवे सरकारांतून मिळाले आहे; म्हणजे हे खंडोपंत शके १६६३ त विद्यमान होते असे ठरते. या वतनपत्रांत खंडोपंत सांगतात की, “ मौजे दिवें व मौजे सोनेरी या गांवांच्या ज्योतिष व कुळकरण या हक्कांच्या बाबतीत थोरल्या शिवाजीमहारांजाच्या वेळी एक निवाड पत्र झाले होते. सदर निवाड पत्र हि या शके १६६३ च्या वतनपत्रांत अक्षरशः उतरून घेतले आहे. त्याचे वर्ष अरबी सन १०६९ शाबान म्हणजे शके १५९० पौष हे होय. हे निवाड पत्र खंडोपंतांचे आजे गोविंद विश्वनाथ यांच्या नांवाचे आहे. त्यांत गोविंदपंत सांगतात की, •* उपर्युक्त दोन्ही हक्क आपले पणजे लक्ष्मीधर भट यांनी प्रथम मिळविले गोविंदपंतांचा काल शके १५९० चा असल्याने दर पिढी सामान्यतः २० वर्षाची धरून, त्यांच्या पणजांचा म्हणजे लक्ष्मीधर भटांचा काल शके १५३० च्या सुमारास येतो. हा अंदाजाने काढलेला काल बरोबर असल्याचा पुरावा या च वतन पत्रांत पुढे आला आहे. लक्ष्मीघर भटास वरील हक शके १५२७ च्या पूर्वी मिळाले होते असा स्पष्ट उल्लेख या पत्रांत आहे; म्हणजे शके १५२७ च्या पूर्वी लक्ष्मीधर भट हे विद्यमान असून त्यांनी वरील दोन गांवांच्या वतनाचे दोन हक्क संपादन केले होते हैं नक्की ठरते. या वेळीं लक्ष्मीधरांचे वय २५ ते ३० पर्यंत असणे असंभवनीय नाही, म्हणजे त्यांचा जन्म शके १५०० च्या सुमारास झाला असावा; म्हणून आम्हीं वर म्हटल्याप्रमाणे पानशांची ऐतिहासिक माहिती शके १५०० पासून मिळते.