पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास. रचा विशिष्टक्रम दृष्टीस पडतो. थोरल्या ( शिवाजी ) महाराजांपासून शाहूमहाराजांपर्यंतच्या कालांत व तदनंतरच्या पेशवाईच्या कालांत या वैशिष्ट्याचे स्वरूप दिसून येते. पहिल्या कालांत घाटमाथ्यावरील देशस्थ ब्राह्मणघराणी जितकी उदयास आली, तितकी पेशवाईत आली नाहीत; मुळीं च आली नाहीत असे आमचे म्हणणें नाहीं. कारण, पुरंधरे, बोकील, दाणी, चंद्रचूड इत्यादि घराणी याच काळांत पुढे आली; फार काय, पण आमचे स्वतःचे च घराणे पेशवाईत जास्त पुढे आले. तात्पर्य एवढे च कीं, पेशवाईंत पूर्वीपेक्षां देशस्थ घराणी कमी उदयास आली आणि कोंकणांतील चित्पावनांचा शिरकाव राज्यांतील जवाबदारीच्या जागांवर उत्तरोत्तर जास्त होत चालला. असा बनाव बनणे यावेळी साहजिक किंवहुना मानवी स्वभावाला अनुसरून च होते. तत्रापि, देशस्थांवर अजिबात वहिष्कार टाकला गेला नव्हता, तर त्यांना हि पुढे येण्यास सवड ठेविली होती. अशा काळांत, वर सांगितल्याप्रमाणे आमचे * पानसे घराणे उदयास आले. या पानसे घराण्याने महाराष्ट्राच्या इतिहासांत काय कामगिरी केली तिची माहिती यथानुक्रमाने पुढे देण्यांत आली आहे. ३. पानसे घराण्याच्या इतिहासाची साधने. ही माहिती देण्यासाठी आतापर्यंत प्रसिद्ध झालेली ऐतिहासिक साधने व इतर साधने ( जितकी आम्हांस मिळाली ) यांचा आम्हीं उपयोग केला आहे. ऐतिहासिक साधनांत, मुख्यतः कै. खरे शास्त्री यांचे “ ऐतिहासिक लेखसंग्रहा ” चे सर्व भाग, कै. इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी प्रकाशित केलेली “ मराठ्यांच्या इतिहासाची साधने ( एकंदर २२ खंडांतील कांहीं खंड ), काव्येतिहाससंग्रहांतून प्रसिद्ध झालेल्या बखरी, कै. वाड यांनी पुणे येथील पेशवे दप्तरांतून निवडून काढलेल्या पेशव्यांच्या रोजनिशांचे सर्व भाग व कैफियती आणि वतनपत्रे वगैरे इतर भाग यांचा समावेश झाला आहे. या खेरीज इतिहाससंग्रह, भारतवर्ष व इतर ऐतिहासिक माहिती प्रसिद्ध करणारी मासिकें आणि आतांपर्यंत प्रसिद्ध असलेले व निरनिराळ्या लेखकांनी लिहिलेले मराठ्यांचे इतिहासग्रंथ हि उपयोगी पडले आहेत. दंतकथांत जरी । ऐतिहासिक सत्याचा भाग कमी असतो, तरी त्यांस मूळ आधार मान्न, ऐतिहासिक कथानकांचा असल्याने आम्हीं वृद्धांच्या मुखांतून ऐकलेल्या दंतकथांना हि ह्या पुस्तकांत ( योग्य ते ) स्थान दिले आहे. या विरहित आम्हांला पानसे घराण्याच्या निरनिराळ्या शाखांत सांपडलेली लेखी व तोंडी. माहिती सुद्धा आम्ही ठिकठिकाणी तारतम्याने जमेस धरली आहे. याप्रमाणे आमच्या या पुस्तकाच्या आधाराचे ( Sources of informations ) हे असे सामान्य स्वरूप आहे. ४. पानसे घराण्याची प्राचीन माहिती. पानसे यांचे मूळ आडनांव पानसी” असून हे ऋग्वेदी, आश्वलायनसूत्री