पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास, प्रकरण पहिलें. श्री. मुरलीधरराची मूर्ति (सानोरी. ) ' | ... १. प्रास्ताविक श्रीशिवाजीमहाराजांनी स्थापिलेल्या “ स्वराज्याच्या अभिवृद्धीसाठी संतराव्या व अठराव्या शतकांत महाराष्ट्रांतील अनेक घराण्यांनी बहुमोल कामगिरी बजाविली असल्याचे इतिहासांत नमूद आहे. या घराण्यांत ब्राह्मण, मराठे व इतर जातींतील घराणी हि पुढे आली होती, ब्राह्मणांत सुद्धां देशस्थ, कोंकणस्थ, क-हाडे आदिकरून पोटशाखांतील कर्तबगार व्यक्तींना आपले कर्तव्य दाखविण्यास वाव मिळाला होता. तो काल आपुलकीच्या स्वराज्याचा होता; स्वराज्यांत जसे विविध प्रकारच्या कर्तबगारींचे चीज होते तरों परकीय अमलांत होत नाही. राष्ट्रांतील नरमणींची बुद्धि स्वराज्यांत प्रखरपणे चमकली जाते; तर परकीय अमलांत तिच्यावर उलट गंज चढला जातो, किंबहुना तो चढविला जाण्याचा बुद्धिपुरस्सर प्रयत्न केला जातो. हा त्रिकालाबाधित नियम असल्याने त्याचे प्रत्यंतर सतराव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंतच्या काळांत दृग्गोचर होते; तथापि पूर्वेतिहासाच्या अवलोकनाने स्वदेशाभिमान जाग्रत होतो व पूर्वजांच्या तेजस्वी कृतींची आठवण मनांत प्रेरणा उत्पन्न करते व प्रस्तुत परिस्थितीत हि मग ती अनुकूल असो, किंवा प्रतिकूल असो, यशस्वी भविष्य कालाचा मार्ग दर्शविते. एतदर्थ, उपरिनिर्दिष्ट घरण्यांपैकी अशाच एका प्रमुख घराण्याचा पूर्वेतिहास प्रस्तुत ग्रंथांत संकलित करण्याचे योजिले आहे. मराठी अमलांतील सैन्यव्यवस्थेसंबंधाने प्रश्न निघाला असतांना, मराठी सैन्याचा जो एक प्रमुख व महत्त्वाचा भाग म्हणजे तोफखाना त्याकडे वाचकांचे सहज लक्ष वेधते. मराठ्यांच्या अशा तोफखान्यावर एका काळीं एका प्रख्यात घराण्यांतील कर्त्या पुरुषांची योजना झाली होती. ते घराणे-नदार पानसे यांचे होय. या घराण्याचा इतिहास हाच प्रस्तुत ग्रंथाचा विषय होय... २. स्वराज्यांतील उदयोन्मुख घराण्यांचे वैशिष्टय. वर सांगितल्याप्रमाणे शिवाजीमहाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यांत महाराष्ट्रांतील निरनिराळ्या जातीतील अनेक घराणी उदयास आली. मात्र या घराण्यांत एक प्रका श्री, लक्ष्मीनारायणाची मूर्ति ( सोनोरी. )