पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१० पानसे घराण्याचा इतिहास. आहेत त्या तुमच्या तुम्ही अनुभवणे. हे पत्र लिहिले. सही छ २९ माहे जुमादिलावल बिकलम नारो यादव पत्र लिहिले सही पत्नी वळी ९१ सुमारे. पत्राप्रमाणे तर्जुमा खंडो बापूजी ज्योतिषी व कुलकर्णी मौजे भोळी, तोंडल, गुणंद परगणे शिरवळ एकूण वळी सुमारे ९४ सही. साक्ष X X X X X X { सदरहू एजितखत यादव रघुनाथ व नारो यादव व खंडो बापूजी यांनी लिहून दिले होते. मनास आणून व पूर्वी पत्राची मखलाशी गौतमतें करून हरदू गांवचे ज्योतिषः-कुलकर्ण जिवाजी साबाजी व खंडो शिवदेव पानसी यांजवरील स्वामी कृपाळू होऊन सदरहू वतन करार केले असे. मौजे तोंडल व भोळी व गुणंद प्रांत शिरवल येथील ज्योतिष- कुलकर्णापैकी निमें यादव रघुनाथ व नारो यादव यासी जिवाजी सावाजी व खंडो शिवदेव यांनी आपले तर्फे दिले होते. त्यांनी खाऊन असावे. वाकी तीन गांवचे ज्योतिष--कुलकर्ण निमें निमें जिवाजी साबाजी व खंडो शिवदेव हे अनुभवतील. सदरहू शिरवळ देशच्या तीनही गांवच्या ज्योतिष-कुलकर्णास परभुणे यास संबंध नाहीं व मौजे लोणी व तोंडल प्रांत पुणे येथील ज्योतिष--कुलकर्ण यादव रघुनाथ व नारो यादव, खंडो बापूजी वगैरे त्याचे गोत्रपुरुषास संबंध नाहीं. वृत्ती संबंधाचे कागदपत्र भवाळापाशी व परभुणे याजपाशी असतील. ते यादव रघुनाथ याजवळ असतील ते रद्द असत. नारी यादव यांनी कागद लेहून दिला की, आपणापाशीं याउपरी वृत्तीचे कागदपत्र नाहीत. कांहीं काम काढून कज्या केला तर त्यास शिरवळ देशाच्या तीनही गांवच्या निमे तक्षीमंत संबंध नाही. जिवाजी साबाजी व खंडो शिवदेव यांनी शिरवळ देशीचे निमें वतन आपलेतर्फे दिले असे. मौजे लोणी प्रांत पुणे येथे विहिरी दोन व वाडा नारो यादव भोगवटी यासाठी बळेच अनुभवीत होता. त्यास दोन विहीरी व वाडा जिवाजी साबाजी व खंडो शिवदेव याच्या दुमाला केल्या. विहिरीचा वाड्याची लागवडखर्च व कांहीं दिवस नारो यादव याने कुलकर्ण अनुभविलें त्याचा मुशाहिरा जिवाजी साबाजीकडून पंचाइतांनीं माफ करविला आणि विहिरीचा आणि वाड्याचा खर्च नारो यादव याजकडून माफ करविला. विहिरीस व वाड्यास या उपरी नारो यादव यास संबंध नाही व कुलकर्णाचा मुशाहिरा ही हरदू गांवचा पेशजीचा जिवाजी साबाजी वैगरे यास मागावयास संबंध नाहीं. जिवाजी साबाजी व कान्हो केशव घर एक व खंडो शिवदेव, माधवराव लक्ष्मण घर एक व बाबूराव सखाजी व दादाजी तानदेव घर एक एकूण तीन भावांचा विस्तार यांनी मिळून खावे. शिरवळ देशीचे तीन गांवचे निम्में वतन व पुणे देशीचे दोन्ही गांवचा बंदोबस्त ज्योतिष-कुलकर्ण पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने चालवून दंडक्रप्रमाणे वतनाची सेवा याच्या हाते घेत जाणे व