पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्टें. २११ कुलकर्णाचे इनाम मौजे लोणी थळ मुकाम पैकीं जमीन बिघे १५ व तोंडलपैकी प्रांत मजकूर येथील भोपळदरा पैकी जमीन बिघे २० सुदामत आहेत. हे ही त्याचे पुत्र-- पौत्रादि निरुपद्रवी चालविणे. या वतनासंबंधे याच्या माथा शेरणी दुतर्फा बेरीज रुपये २०० करार करून वसूल निमे हुजूर व निमे जिल्हेकडे घेतला असे. प्रतिवर्षी नवीन पत्राचा आक्षेप न करणे. या पत्राच्या प्रती लावून घेऊन हे अस्सल पत्र भोगवटी याजपाशीं परत केले. जाणिजे. बहुत काय लिहिणे तरी सुज्ञ असे. मोर्तब असे. • सदरहूचे अस्सल महजरावर दर चिकट पानावर मोर्तब असत. अस्सल पत्र राजेश्री रामाजी महिपतराव पानसी जोशी कुळकर्णी मौजे मजकूर याचे घरीं असे व सदरहू महजरांत एजितपत्र वर केले असे ते अस्सल एजितपत्र ही रासाजी महिपतराव यांचे घरीच असे. = = में समाप्त ==

==

समाप्त, है।