पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| परिशिष्ट. ३०९ मुक्काम अहिरें प्रांत शिरवळ हे घेतले. व तकरारी तुम्हीं वं आम्हीं राजेश्री निकै विठ्ठल देशपांडे प्रांत पुणे याच्या विद्यमाने दिल्या. त्यावर ही हकिकत मनास आणिता तुम्ही मूळ वतनदार आम्ही पाठीराखे परकी असे पंचाईत मते दिसून आले. निर्वाह करावा तो श्री. रा. पंतप्रधान स्वारींत गेले. त्यावर राजेश्री मल्हार तुकदेव पुरंदरे हिंमत राजेश्री पंतप्रधान यांजपाशी वादानिमित्त राहिले. त्यांस त्यांनी महाराज राजेश्री स्वामीची आज्ञा घेऊन कागदपत्र आणावयास मागते फर्माविले त्यास आम्ही पेशजीच्या निवाड्याचे राज्यपत्र शके १६४२ शारवर्य नाम संवत्सरचा दाखविला. आम्हांस कागद आणावयास आज्ञा केली त्यास खंडो वापूजी कागद अणावयास मौजे तोंडल परगणे शिरवळ येथे पाठविले त्यास श्रीवारणेश्रराचे देवळी तुमचे भाऊ दादाजी तानदेव आम्हांकडील यादव रघुनाथ आपले बाप व पिसाजो यादव व बंडो बापूची आपले भाऊवति राहात सुलतानजी माजे भवाळी व सिदोजी पाटील गावडे जाधव मौजे तोंडल परगणे शिरवळ असे बसून आमचे कागद मनास आणले. मखलाशीं करितां कागद दाखवून दिसून आले. दरबारास आणावयास योग्य नव्हते. या दोघांत आमचे वडील व आम्ही मिळून विचार केला की आपण जडे वृत्तीतील गांवचे शिरवळ-देशचे हे गोतमुखें खरे होईल. नामदेव भटाचे नक्कल झाले. वंशावळही मिळत नाही. असे असून सांगावे तरी शिरवळ देशींच्या तीन गांवच्या वाट्यास तूर्त अपाय होईल हे चित्तास आणून तुमचे पुणे देशचे दोन्ही गांवांपैकी निम्मे वतन कांही दिवस आपण खात होतो त्यास दोन्हीचे तुमच्या स्वाधीन ज्योतिष व कुलकर्ण केले असे. शिरवळ देशचे तीनही गांव तुमचे वसूली आम्हांस नामदेव भटास भाऊ करून निम्मे तक्षीम दिली आहे. त्यास ते आपण निम्मे खाऊन निमे तुम्ही आपली खाणं.पुणे देशच्या दोनही गांवांस या उपरी आपला कांही संबंध नाही. पुरातन महजराचा लेख मनास आणिला. परभुणे यांच्या वेळेस वाद तीनही गांवचा पूर्वी पडला होता, तेव्हां नामदेव भटास साबाजी वयाजी पाठी. राख करून शिरवळ देशीच्या तीन गांवांपैकीं तक्षीम दिली. दोन गांवचा कांहीं पूर्वी वाद पडला नाही. दोन गांव पुणे देशीचे निर्वेध तुमचे आहेत. ते तुमचे तुम्ही घेणे. हे पत्र तुम्हांस आपले खुष राजीने लिहून दिलें असे. या उपरी तुम्हांस अगर आमच्या कोणा भाऊबंदास पुणे देशच्या दोनही गांवांस वतनासी अर्थाअर्थी संबंध नाही. सुखरूप तुमचे गांव दोबस्त ज्योतिष कुलकर्ण तुमचे तिघे भाऊ खाणे. यास कोणी आ अगर आमचा वंश हरकत करील तरी त्यास पंचमहापातकाची आण असे. व दिवा पाचे गुन्हेगार व गोताचे अन्यायी. आम्हापाशी कागदपत्र X X X X X असतील ते कुल रद्द असे. तुमच्या वडिली नामदेव भटास शिरवळच्या तीन गांवांत तक्षीस परभुणा गणावा बिन बावजी याच्या वादापासून शके १५२७ विश्वावसनास ॐ तक्षीम दिली आहे त्याप्रमाणे चालविणे. तुमची तक्षामे तीन तीन गांवांत आहेत तम् खाणे. याखेरीज मौजे लोणी तर्फ निरथडी प्रांत पुणे येथीलवाडा व विहीर १४