पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०८ पानसे घराण्याचा इतिहास. ठेवीची पुरसीस केली की, हुकूमाच्या कागदावर देशमुखाचा शिका म्हणितोस तरी देशमुखाच्या मोझा (१) घेऊन येणे. त्या वेळेस नारो यादव निरुत्तर झाला. त्यावर पंचाईतांनी सांगितले की जिवाजी सावाजी व यादव रघुनाथ श्रीकृष्णेमध्ये घालून याच गांवचे गोत आणून श्रींत घालून ज्यास ओढून काढतील त्याने वतन अनुभवावे असा राजिनामा मागितला. त्यास यादव रघुनाथ व नारो यादव राजी न होय. वंशावळ मनास आणतां जिवाजी साबाजी यानें प्रांत. पानगांव येथून वंशावळ लिहून दिली. यादव रघुनाथ याने नामदेव भटापासून लिहून दिली. त्यामध्ये नामदेव भटाचे ते नकल. आणि आपण त्याच्या वंशाचा विस्तार म्हणून लिहिले, अगोदर एक वंश म्हणत होतो. वंशावळ मनांत आणतां तींत असे दिसून आले की, पानसी यांनी नामदेवभट भाऊ केला त्याचे नकल झाले. तेव्हां पांच गांव पानसी यांचे पंचाईत मते व देशमुख देशपांडे यांच्या मते जिवाजी सावाजी व खंडो शिवदेव याचेच पांच गांव पूर्ववत् प्रमाणे दाखविले. त्यावर गोविंद यादव व व्यंकाजी कृष्ण देशपांडे परगणे शिरवळ हे हुजूर आले. त्यास विचारता त्यांनी ही नामदेव भटाची वस्ती तीन गांवांत शिरवळ देशीच्या परभुणे यांच्या वादापासून आहे म्हणून साक्ष दिली. त्यावर पंचाईतांनी यादव रघुनाथ व नारो यादव व खंडो बापूजी यास आज्ञा केली की, मूळ वृत्ति जिवाजी साबाजी व खंडो शिवदेव यांची. तुम्ही नामदेव भटाच्या नांवावर खातां त्यास नामदेव भटाचे नकल झाले. या उपरी हे होऊन तुम्हांस वृत्ति देतील ते खाणे. नाही तर तुम्हांस मिळत नाही. मग यादव रघुनाथ व नारों यादव व खंडो बापजी मिळून जिवाजी साबाजीस व खंडो शिवदेव यास बजीद होऊन एजितखत लिहून दिले. जिवाजी साबाजी व खंडो शिवदेव यांनी आपली नातवांनी जाणून त्याचे एजितखत पंचाचे विद्यमाने निळो विठ्ठल देशपांडे प्रांत पुणे व अजम शेखनिरा व त्र्यंबकराव धायगुडे आज हात देशमुख परगणे. शिरवळ वगैरे वतनदार मार्फतीने लिहून घेऊन हुजूर आणून दाखविले एजित बितपशील:--- एजितखत शके १६६४ दुंदुभी नाम संवत्सरे श्रावण शु॥ १ वुधवार ते दिवशी जिवाजी साबाजी व खंडो शिवदेव व दादाजी तानदेव पानसी. जोशी कुळकर्णी मौंजे भवाळी व तोंडल, गुणंद प्रगणे शिरवळ व मौजे लोणी व तोंडल तर्फ निरर्थडी प्रांत पुणे यासी यादव रघुनाथ व नारो यादव व खंडो वापूजी कुलकर्णी व जोशी मौजे भोळी च तोंडल व गुणंद प्रगणे शिरवळ सुरू सलास अर्बन मया अलफ. सन इसार ११५२ कारणे लिहून दिले. एजितखत ऐसिजे. तुमचा आमचा वाद मौजे तोंडल व लोणी तर्फ निरथडी प्रांत पुणे येथील जोशी कुलकर्णीपणाचा पडला. त्याजमुळे तुम्ही व आम्ही सातारा यास वादास आलो. श्रीमंत राजेश्री बाळाजी बाजीराव प्रधान याजपाशीं साताप्याच्या मुक्कामी क्रज्ञा पडला. तुम्हांस जमान नरहर विश्वनाथ कुलकर्णी मौजे त्रिपुटी संमत कोरेगांव प्रांत वाई हे घेतले व आम्हांस जमाने जानो बल्लाळ वाघ कुळकणीं