पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| परिशिष्टे. ३०७ मनास आणता यादव रघुनाथ व बापूजीपंतास संबंध नाही. याज निमित्त यास रा. स्वामीची आज्ञापत्रे करून दिली आहेत. तुम्हांस हि पत्र आहे तरी तुम्ही रत्नाजी बहिरव व केसो पानसी याजपासून वतनाचा हिशेब घेणे. आणि याची सर्व प्रकारे चालविण्यास अंतर न करणे. बहुत काय लिहिणे. आज दिवाण प्रांत वस्ति शिरवळ तहा मोकदमानी देहाय मौजे भवाळी व तोंडल वं गुणंद परगणे मजकूर तोंडल व लोणी तर्फ नीरथडी परगणे पुणे या दोन्ही गांवास सुरू सन अर्वा अवैन अलफ, नामदेवभट पन्हंभट व साबाजी बयाजी पानसी हे वसुलीचे भांडणाकरितां ठाणे मजकुरास आले. त्यावरून देशमुख व देशपांडे व मोकदमाच्या विद्यमाने उभयता वर्षली करावयास हुकूम केला तरी त्याजपासून वर्षली प्रमाणे सेवा घेण्यास कोणी हरकत करील त्यास हुजरून परभारें ताकीद होईल जाणिजे छ २६ रविलावल. सदरहू कागदांपैकीं जिवाजी साबाजी व खंडो शिवदेव पानसी यांनी पूर्वील महजर व रा. खंडो बल्लाळ चिटणीस याचे पत्र व राजपत्र रा. रायाजी जाधवराव यांचे नांवचे व देशमुख देशपांडे प्रांत पुणे यांच्या नांवचे व हरदू मोकदमाच्या नांवचे ऐसीं पांच पत्रे दाखविली व नारो माधव व खंडो बापूजी यांनी वाट्याचे ताकीद पत्र दाखविले. येणेप्रमाणे कागद हरदू वादी याचे मनास आणितां पंचायत मते निवाडा झाला. जे पूर्वी महजर मनास आणता त्यामध्ये शिरवळ देशच्या तीन ही गांवचा च मजकूर आहे व वादी परभुणा याच तकरीरांत वाटेगांवच्या स्थलांचावाद साबाजी बयाजी यांनी सांगितला. त्यावरून दिसून आले की नामदेवभट शिरवळच्या रव्या पासूनच पाठीराखा केला. त्या पूर्वी दाखला नाही. त्यांनी वर पेशजी मनसुबी हुजूर आली ते समय रा. खंडो बल्लाळ चिटणीस यांनी मनसुबी केली, ते समयीं यादव रघुनाथ गैरहजर होऊन एजितृखत न दिले. मग रत्नाजी बहिरव व केसी राम पानसी जिवाजी साबाजीचे चुलते यासी वृत्तीची दुमाल पत्रे हुजूरची राज्याभिषेक शके ४७ शार्वरीनाम संवत्सरे करून दिली. व रा. खंडो बल्लाळ यांनी रायाजी जाधवराव मोकाशी देहाय मजकूर आपलें पत्र निवाड्याचे करून दिले. हा मजकूर नारो यादव व खंडो बापी यांचे गुजारतीने खरा झाला. त्यावर नारो यादव यानें वाट्याचे पत्र दाखविले. त्यांत मखलासी मनास आणितां शिरवळ देशचा हक्क, याचा रोखा त्यामध्ये पुणे देशचे नाव लिहिले हे असंमत आहे व याचे X X X कोनाड्यामध्ये जागा ठेवून देशमुखाचा शिक्का केला त्यास हक याच्या कागदांमध्ये देशमुखीचा शिका होत नाहीं व देश. मखाच्या कारकीदास नाव नाही व देशपांडे यांचंही कलम नाही व शि , व पणे देशचे गांव सरमिसळ रोखा झाला. त्यावरील शिरवळच्या देशमुख शिका करून हे ही घडणार नाही. शिका वाचावा तरी त्यांतील अक्षर उमजत नाही. तेव्हा पंचाईतीच्या मते तो कागद दाखवून ठराविक यादव रघुनाथ व नारो यादव यासी