पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०६ पानसे घराण्याचा इतिहास. बोलिला जे त्याचा हात पाहाणे. पत्र खोटें आणले आहे. पत्र पाहातांच मधले बोट रवा लागला होता हैं तुम्हां सभा नाइकास कळले. त्यावरी भिऊन प्रगणे मजकुराचा महजर दिला नाही. यावरी वयाजी व गोमाजी परभुणा सुप्यास जाऊन धारराव फर्जद व गणोजीचा त्याचे खुद्द खत घेऊन आले. त्या तागाईत खात होता. हल्ली उभय वर्ग साहेबापाशी उभे राहिले आहे. त्याचा धर्माने निवाडा केला पाहिजे. राजमुद्रा व समस्त संभांनाइकी मनास आणून श्री केदारेश्वरीं स्थान दिव्य होऊन निवाडा करावा असे केले होते. वादी यास उभय वर्गास योजल्यावरी शनिवारी अग्रवादी नामदेव भट विन पन्हंभट यांनी दिव्यास उभा राहिला. मजकुराची निशाणी लिहून काढली. सावण व निंबे लावून हात धुतला. खलित घालुन लखोटा केला. त्यावर पश्चिमवादी गोमाजी निंबे लावून हात धुतला. खलित परभुणा त्याची नखे काढून हात धुतला. खलित घालून लखोटा केला. अवखानी (रात्रीं) राहिले. दुसरे दिवशीं चैत्र व॥ ७ आदितवारी श्री केदारेस्थानी सभा भरून अग्रवादी नामदेव भट पानसी पश्चिमभागी गोमाजी परभुणा परटाचे पडदनी घेऊन ( केदारबावीस ) आंघोळ करून केदारेश्वरापुढे केदारे सन्मुख उभे राहिले. तूप व तेल घालून थाळी सांडसी धरून ताह्मणामध्यें ओतिली. सातही मंडळे टाकून नामदेव भट अग्रवादी याचे रवा काढला. तो गोमाजी परभुणा पश्चिमवादी याने साउली केली. नामदेव भट अग्रवादी रवा काढून खालता टाकिला. लखोटास हात घालून देवास प्रदक्षिणा करून आला. मग त्याचे हात खलिता घालून लखोटा केला. गोमाजी परभुणा पश्चिमवादी याने हाती साऊली केली. नामदेव भट अग्रवादी रवा काढून खालता टाकिला. लखोटास हात घालून देवास प्रदक्षिणा करून आला. मग त्याचे हाती खलिता घालून लेखौटा केला, गोमाजी परभुणा पश्चिमवादी याच हातीं खलिता घालून लखोटा करून दोघे ते वादी तुरुंगांत राहिले. तिसरे दिवशी मंगळवारी समस्त सभानाईकीं बसवून हरदूवादी यास बोलावून लखोटा फोडून नामदेव पानसी याचा हात पाहिला. खरा निघाला. रवा उतरला तो गोमाजी परभुणा मजकूर हारविले. खोटा झाला. त्यास हरदू गांवच्या ज्योतिष कुलकर्णाशी संबंध नाहीं. नामदेव भट बिन पन्हंभट व साबाजी बिन बयाजी पानसी यांनी ज्योतिष कुळकर्ण व मौजे भवाळी व मौजे तोंडल व मौजे गुणंद मिरासी जितली. हा महजर सहीः-- राजेश्री शिवाजी जाधवराव गोसावी यास. अखंडित लक्ष्मी अलंकृत रा. रा. खंडो बल्लाळ चिटणीस राम राम. उपरी येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहीत जाणे. यानंतर मौजे तोंडल मौजे लोणी तर्फ निथडी येथील ज्योतिष कुळकर्णाची वृत्ति रा. रत्नाजी बहिरव व केसो राम याची आहे. त्यास तेथील निमे वृत्ति यादव रघुनाथ व बापूजी काशी आपले म्हणतात. या गोष्टीचा परिणाम