पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्टे. ३०५ फिर्याद जाहलों, गोताने त्यास बोलावून मौजे वाटेगांव प्रांत शिरवळ येथे दिव्य नेमून पाठविले. उभयवर्ग तेथे गेलो. गोमाजी यानें रवा केला. तिसरे दिवशी हात पाहिला. गोमाजी परभुणा मजकुरास रवा लागला. आपण जयपत्र मागत होतो. सभानाइकीं आपणास बोलिले. मग आपण ते सभेस बोंब मारून निधून शिरवळास आल. सदरहू समाचार सभानाइकास सांगितला. तो गोमाजी व बयाजी परभुणा मजकूर ते हि खोट पत्र वाटेगांवचे आणिलें. सभेस दाखविले. ते समयीं ते सभेस आपण बोल केळे, खोटपत्र आणेले Xxx मजकुरास रवा लागला. पाहिला. त्यावर सभानाइकी हात पाहिला. मध्ये बोटीं फोड आला होता. सभानाइकीं देखिल्यावर बयाजी व गोमाजी मुतालीक रूपाई आवाचे वेळी उठले. सुप्यास गेला. धाररावास भेटला. सदरहू समाचार सांगितला. धारराव फर्जद व गणोजी मजकूर सदरहू गांव आपला दुमाला करविणे म्हणन कारकुनास व देशमुखास कागद दिला तो घेऊन महालास आलों. महालास कारकून यांनी व देशमुखांनी सदरहू गांव आपले दुमाला करून मिसल दिला. त्यावर बयाजी परभुणा यांनी रूपाईकडून धाररावास सांगून सदरहू गांव मागून घेतले. आम्हांस बाहेर घातले. पुंडाचा खोटा खातो. सदरहू गांवीं ज्योतिष-कुलकर्णाची आपली मिराशी दिव्य रवा करून साधिले. हे तकरीर सहीं. | पश्चिमवादी गोमाजी बिन गणावा परभुणा जोशी व कुलकणीं मौजे भवाळी व तोंडल व गुणंद प्रांत मजकूर येथे व्यवहार भाविक असन मौजे मजकूरचें ज्योतिष आपले मिरासी आपले वडील खात होते, त्याजपाशीं अलीकडे गेली होती. आपण कारकीर्द व गणोजी निंबाळकर याचे फर्जद धारराव यासी मोकासा मजकूर होता. त्यास मालूम करून सदरहू गांव आपले मिराशी म्हणून घेऊन चालू लागलो. त्यावर साबाजी बिन बयाजी पानसी प्रगणे मजकूर फिर्याद जाहला. निवाडा करितां आपली मिरास घेऊन खातो. त्यावर सभानाइकी आपणांस बोलावून आणून दिव्य नेमून दिले. मौजे वाटेगांव प्रगणे शिरवळ येथे साबाजी बिन बयाजी पानसी व आपणांशी पाठविले. तेथे उभय वर्ग गेले. रवा काढला. तिसरे दिवशीं सभानाइकी बसून हात पाहिला. रवा उतरला म्हणून पत्र देत. साबाजी बिन बयाजी पानशी बोलिलो आणि निघोन आला. आपण जयपत्र घेऊन मागून आलो. प्रगणे मजकुरी सभानाइकास दाखविले. सभानाइकीं महजर देखिला. मग आपण सुप्यास जाऊन रूपाईस व धाररीवास भेटलो. त्यास समाचार सांगितला. ते ही आपणास कागद देऊन सदरह गांवास पाठविले. त्या तागाईत पांच वर्षे खात आहों. आपली मिरास हे सत्य, यावर राजमुद्रा बोलिले जे सदरहू तकरीरा उभयतां लिहून दिले आहे, हे अम्मल कसा आहे म्हणून साहेवीं सभेसी पुसिलें, त्यावर सभानाइकी जाब दिला. उभय वर्गाचे दिव्य मौजे वाटेगांव प्रगणे शिरवळ येथे जाहलें. तेपासून प्रगणे मजकुरास आले, गौमाजी परभुणा याने पत्र आणले होते ते दाखविले. त्यावर साबाजी पानसी