पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०४ पानसे घराण्याचा इतिहास. त्याच्या गोत्रपुरुषांस आपण कांहीं भाऊ केले नाहीं. हे गौतमुखें व पांढरीच्या मुखें व क्रियेने खरे करून देऊ. मखलाशी करून इनसाफ करणार सोा धनी आहेत म्हणून तकरीर केली. । तकरीर करद यादव रघुनाथ व खंडो बापूजी तकरीर केली ऐसिजे. मौजे भोळी तोंडल, गुणंद प्रगणे शिरवळ व मौजे लोणी व तोंडल प्रांत पुणे हे पांच गांव आपण १३५ वर्षे अनुभवत आहोत. दरम्यान कज्जा करितात. हॅल्लीं साहेबापाशी आपण येऊन उभे राहिलो आहों. दिवाणाचा कागद आपणापाशी आहे. तो मनास आणावा आणि आपला इनसाफ करावा. नामदेवभट आपले वडील त्यांचे नक्कल झालें म्हणतात. त्यास त्यांचे नक्कल झालें खरें च. परंतु आपण त्याचे भाऊबंद त्यांचे वृत्तीचे ......हे गोतमुखें खरें करून देऊ. साबाजी वायदेव याच्या कारकीर्दापासून वतन अनुभवीत आहों. परभुणे याचा रवा झाला. त्या वेळेस महजर जिवाजी साबाजी यांनी काढला. आमचे कागद मनास आणून इनसाफ करावा म्हणून तकरीर केली. पत्र महजर परभुणे याचे वेळेस रवा होऊन निर्वाह जाहला बीतपशीलः-- महजर ता. छ २२ जिल्काद हजीर मज्यालस. गोही गोही सुरू सन सोत व अलफ. श्री शके १५२७ विश्वावसुनाम संवत्सरे चैत्र व॥ ९ मंगळवार महजर झाला ऐसाजे. मौजे तीन बीतपशील:--मौजे भवाळी, मौजे तोंडल, मौजे गुणंद प्रगणे मजकूरचे ज्योतिष-कुळकर्णाबद्दल. नामदेवभट बिन पन्हंभट व साबाजी बिन बयाजी पानसी व गोमाजी विन गणावा परभुणा याजला Xxx सालमजकुराकारणे अग्रवादी नामदेवभट विन पन्हंभट, साबाजी बिन बयाजी पानसी, पाश्चिमवादी गोमाजी बिन गणावा परभुणा उभा राहिले. व्यवहार भावी ( १ ) केले, बितपशीलः अग्रवादी नामदेवभट विन पन्हंभट व साबाजी बिन बयाजी पानसी. अग्रवादी, यांनी व्यवहार गांवीं कजे २ मौजे तीन बितपशीलः मौजे भवाळी, मौजे तोंडल, मौजे गुणंद. प्रगणे मजकूर येथील ज्योतिष-कुलकर्ण आपले मिराशी आपले वाडिलापासून खात आलो. दरम्यान गोमाजी परभुणा याने व गणोजी निंबाळकर पुंड याचे कारकीर्दीस गोमाजी मजकूराचा वाद बयाजी बिन गणावा परभुणा हा रूपाई अवापाशीं चाकर होता. त्याची वग करून सदरहू गांव आपले मिराशी म्हणून जोरीने घेतले. त्यास त्यावर चालू लागला. आपण गोतापाशी