पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्टें. २०३ राजास अर्ज करून दोन गांवची ज्योतिष-कुळकर्णाच्या वृतीचीं राजपलें करून देवविली व मशारनिल्हे आपलें पत्र राजेश्री रायाजी जाधवराव मोकाशी यांसी निवाडा देण्याचे दिले असतां मागती माधव रघुनाथ व खंडो बापूजी हरदू गांवचे ज्योतिषकुळकर्णी निम्में वतन आपले म्हणून भांडतात. याजकरितां ते व आपण राजेश्री बाळाजी बाजीराव प्रधान यांजपाशीं सातारा मुकामी आलों. त्यांनी आम्हांस नरहर विश्वनाथ कलकण मौजे त्रिपुटी संमत कोरेगांव प्रांत वाई हे जमान घेतले व वादी यास जानो वलाळ वाघ कुलकर्णी मौजे अहिरें तालुके शिरवळ हे जमान घेतले. आणि आम्हां 2 जणांच्या तकरीरी निळी विठ्ठल देशपांडे प्रगणे मजकूर यांच्या विद्यमाने लिहन घेतल्या. त्यावर राजेश्री पंतप्रधान स्वारीस गेले. आम्हां हरदू वादी यास राजेश्री मल्हारपत पुरंदरे श्रीमंत पंडित मजकूर निसवत यांजपाशीं वादानिमित्त सातारी पाठविले, त्यास त्यांनी महाराजांस विदित करून मनसुबीची आज्ञा घेऊन पुढील कागदपत्र आणावयास फर्माविले. त्यावरून आम्ही हदू वादी गांवास जाऊन पुढील कागदपत्र आणून दाखविले. बितपशील व तकरारी वितपशील:---- तकरीर कर्ते जिवाजी साबाजी वगैरे भाऊ यांनीं तकरीर केली, मौजे भोळी व मौजे तोंडल, गुणंद प्रगणे शिरवळ व मौजे लोणी व तोंडल प्रांत पुणे हे पांच गांव पुरातन आपले मिराशी. यांस पूर्वी भवाळ आपले मिराशीवर शिरवळ देशच्या तीन गांवांत आपले म्हणून उठले होते. त्यास त्याचे आमचे भांडण पडले. मग त्याशी आम्हांशीं मोहरी तर्फ गुंजण मावळ.........येथील देशमुख व देशपांडे यांसीं दिले. तेथे आमचे वडिली दिव्य केले. आपला वडील भूतो परशुराम खरा झाला; आणि भवाळ खोटे झाले. त्यावरी कित्येक दिवस सदरहू तीन गांवच्या शिरवळ देशाच्या परभुणे वादास उठले. परभुणे यांस आपले वडील साबाजी बायदेव यांस मौजे वाटेगांव प्रांत बत्तीस शिरोळे येथील स्थळ दिले. तेथे परभुणे मजकूर दिव्य केले. परभुणा खोटा झाला. परंतु.........ते वेळेस कसबे शिरवळी त्यांचा व सावाजी बायदेव यांसी आपले वडील यांचा इनसाफ जाहला. श्री केदारेश्वरीं दिव्य साबाजी बायदेव याने करावे असा निश्चय केला. ते समय आपले वडील शिवाजी बायदेव पानसी... ...म्हणून नामदेवभट बिन पन्हंभट वस्ति कसबे शिरवळ मुद्गल गोत्री म्हणून पाठीराखा भाऊ करून शिरवळ देशीच्या तीन गांवांत निम्मे तक्षम देऊन त्याजकडून दिव्य करविले. वृत्ति साध्य केली. परभुण खोटा झाला. तो महजर व जिन्नस मनास आणावा. नामदेवभट याचे नकल झाले. त्याचे गोत्र पुरुष यादव रघुनाथ वगैरे याच गांवांत भोगवटा करून वृत्ति बळे च निम्मे खातात. शिरवळ देशीच्या तीन गांवांपैकी निम्मे वृत्ति नामदेवभटास दिली होती, त्याचे नक्कल झाले. दोन गांव पुणे देशीचे निर्वेध आहेत. दरोवस्त पांच गांवचे वतन आपले आहे. नामदेवभटाचे बुडालें तरी आपण खाऊ. आपण बुडालों असतौं तरी त्याचा वंश असता तरी तो खाता.