पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ पानसे घराण्याचा इतिहास. । ३ मिस्तर एलफिन्स्टन असे म्हणाले की, दक्षिणेतील चीफांपैकी पुष्कळ जणांस मी उपजीविका देण्याची सूचना ( मुख्य सरकारास ) केली, ती लोकांची नाराजी न व्हावी व थोर सरदारांचे घराण्याचा अति सत्वर व्हास न व्हावा या मतलवास्तव केली. परंतु इतर प्रकरणांत जी सिफारस मी केली, ती उपभोग करणाराचे दावे वंशपरंपरेचे उपभोगावर होते, ते केवळ देहनग्याचे कारणाने नव्हते, तर बहुत मुदतीचे भौगवट्यामुळे आहे; असे मला वाटल्यावरून मी ती केली. आणखी ते साहेव असे म्हणाले की, वर लिहिली सेवटची व्याख्या ज्या सरदारांचे घराण्याकडे, त्यांच्या जहागिरी मोंगल बादशहा अथवा सातारचे राजे यांजकडून चालत होत्या, त्या सर्व घराण्यांस लागू आहेत. | ४ या साहेबांनी पुढे आणखी असे कळविलें कीं, पेशव्यांचे जहागिरदारांची स्थिति निराळी आहे. जो राजवंश आम्ही पदच्युत केला, त्या वंशाचे वेळेस त्या जहागीरदाराचे उदय जाहले आहेत, व त्यापैकी कोणाचा हि कवजा सत्तर बर्षांहून अधिक मुदतीचा नसोन त्याजपासून नोकरीसववी ( संबंधी ) ने घेतली जात होती व त्याप्रमाणे च त्यांच्या खच्या प्रकारच्या व ख-या विस्ताराच्या स्थावर मिळकती प्रसंगो.. पात खालसांत केल्या जात होत्या. ह्यामुळे ते माझ्या ध्यानांत राहिले आहे. तथापि, त्यांजकडे वास्तविक च आधिकार चालत होते. यामुळे त्याचा मान मोठा असून, त्यांचे योग्यतेनुसार, अथवा महत्त्वाप्रमाणे त्यास आपल्या जातीच्या जमिनी एक अथवा अनेक पिढ्यापर्यंत आपलेकडे ठेवण्याची परवानगी मिळत होती. १५ याप्रमाणे मिस्तर एलफिन्स्टन यांनी दोन प्रतीचे सरदार कबूल केले. एक जे मोंगल बादशहाचे व सातारच्या राजांचे जे. या प्रतीविषयी त्यांनी अशी शिफारस केली की, या प्रतींतील जहागीरदारांच्या जामिनी शब्दांचे पुरे अर्थप्रमाणे वंशपरंपरेनें चालवाव्या. दुसरी ( प्रत ) पेशवे यांचे जहागीरदार. या प्रतीविषयी त्यांनी असे सुचविलें कीं, त्यांचे दावे ( हक ) एक अथवा दोन पिढ्यापर्यंत या आपले जमिनीचे उपभोग करण्यावर आहेत. | ज्या नानाप्रकारचे प्रकरणांचा विचार चालला आहे, त्या प्रकरणांस वर दिलेले नियम लागू करण्याविषयीं यत्न करण्यांत मिस्तर मिल्स ( म्हणजे ) सरदार लोकांबद्दलचे त्या वेळचे अॅक्टिग एजंट यांची गैरसमजूत जाहली, ती दुरुस्त करण्यांत तुम्ही चुकलो आहोत. ७ ते ( मिस्तर मिल्स ) असे म्हणतात की, दक्षिणेतील सरंजामांपैकी कोणता हि सरंजाम मिस्तर एलफिन्स्टन यांणी केलेल्या पहिल्या प्रतीत येत नाही. कारण, ते दरोबस्त सरंजाम पेशवाई अंमल सुरू जाहल्यापासून दिलेल्या देणग्या आहेत. हा परिणाम, असे कळविल्यावरून जहाला कीं, पाहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे राज्य सन १७१४ इ॥ साली सुरू जाहलें व त्यामुळे अति प्राचीन देहनग्याची तारीख कळोन येत आहे, त्या देहनग्या सन १७१९ पूर्वीच्या आहेत.