पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशएँ. १९७ एक गांव नूतन इनाम करार करून देऊन चालविले पाहिजे म्हणोन, त्याजवरून मनास आणतां तुम्हीं बहुत दिवस स्वामिसेवा एकनिष्ठपणे केली यास्तव तुमचे चालविणे अवश्यक जाणोन तुम्हांवरी कृपाळू होऊन तुमची मातुश्री भीमातिरां राहाणार; त्याचे सत्कालक्षेपानिमित्य मौजे सांगवी त॥ सांडस प्रांत मजकूर हा गांव खेरीज मुकासा करून, स्वराज्य व मोगलाई देखील सरदेशमुखी दरोबस्त कुलवाब कुलकानु हल्ली पट्टी व पेस्तर पट्टी जल-तरू-तृण-काष्ट-पाषाण-निधिनिक्षेपसहित, खेरीज हक्कदार व इनामदार करून, इनाम तिजाईसुद्धां, सरकारांतून नूतन इनाम करार करून दिला असे; तरी मौजे मजकूर सदरहूप्रमाणे आपले कुमाला करून घेऊन तुम्ही वडिलांचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें इनाम अनुभवून सुखरूप राहणे. जाणिजे. छ ३ मोहरम. आज्ञा प्रमाण. परिशिष्ट अठ्ठाविसावे, ( भाषांतराच्या नकलेची नक्कल.) राजकीय खाते. नंबर १७ सन १८४२. लंडन ता. २६ अकटोबर १८४२. यांसः-- मुंबई येथील आमचा गव्हरनर १ आम्हीं ता. ७ फेब्रुवारी १८३८ इसवी रोजी मुख्यः सरकारास जे हु॥ केलें, या वाहकूम दक्षिणेतील सरंजामी जमिनीचे नानाप्रकारचे वहिवाटदार यांचे हक्कांच पन्हा विचार केल्याचा काय परिणाम जाहला, तो तुम्ही आपले नंबर ५१, ता। २६ शस्य सन १८४१ चे ज्या राजकीय पत्रांत, आम्हांकडे लिहून पाठवतां, त्यो तुमचे पत्राचा जबाब आम्ही खाली पाठवितों, २ दक्षिणेतील जहागीरदारांच्या प्रतींचा जो पड, मिस्टर वार्डीन यांनीं तुमचे सरकाराने करून दिल्हेले नियमाप्रमाणे तयार केला व मिस्टर मारियैट यांनी तपासून दरुस्त केला, तो पट आम्हांकडे पाठविल्याने वर लिहिलेले हकम करण्या उपस्थित जाहलें. सदरहू नियमांत, त्यांपैकी कोणते येक जणास, आपले जमिनीची वहिवाट करण्यास जी अति मोठी मुदत दिल्ही होती, ती काय ती, येक अधिक पिढीपर्यंत होती. जरी या व्यवस्थेमुळे जहागीरदार यांस दिलेली वचने मोडली गेली नसतील, तरी ती व्यवस्था, मिस्तर एलफिन्स्टन यांनी दप्तरी लेहून ठेवलेले पुष्कळ विरुद्ध होती व त्या बाबतीत आम्हीं मिस्तर एलफिन्स्टन यासी पत्रव्यवहार केल्यावर. त्यांजकडून जो कागद आला त्याचे हसील आम्हीं इंडिया सरकारा । पाठविले. त्यांत जे नियम मांडून दिल्हे आहेत त्याप्रमाणे सरंजामाचे बाबतींत व करते वेळेस वागणूक करावी असे आम्ही फरमावीत आहोत.