पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९६ पानसे घराण्याचा इतिहास. करार करून दिला असे. तरी सर्दहू प्रमाणे कसबे मजकूरचे मुकासा बेचा अंमलः तुम्ही आपले दुमाला करून घेऊन तुम्ही व तुमचे पुत्र पौत्रादि वंशपरंपरेनें इनाम अनु भवून राहणे जाणिजे. छ १६ जिल्काद ( मार्गशीर्ष वद्य द्वितीया ). पशिष्ट सव्विसावे, मौजे तुळजापूर गांव इनाम, म॥ अनाम माधवराव कृष्ण व भिवराव यशवंत, उपनांव पानसी, गोत्र मुद्गल, सूत्र आश्वल्पयन, देशपांडे प्रे॥ पानगांव सरकार परांडे यांसी, माधवराव नारायण प्रधान सु॥ तिसा सवैन मया व आलफ. शके १७०० विलंबीनाम संवत्सरे. तुम्ही हुजूर किल्ले पुरंदर येथील मुकामी येऊन विनंती केली की, आपण बहूत दिवस स्वामिसेवा एकनिष्ठपणे केली; कुटुंबवत्सल आहों. त्यास स्वामींनी कृपाळू हाऊन, मौजे तुळजापूर प्रे॥ नेवासे सरकार अमदनगर हा गांव खेरीज मुकासा करून दरोबस्त आपणास ब॥ मु॥ ( बद्दल मुशाहिरा ) दिला आहे. तो हल्ली कुटुंबाचे योगक्षेमार्थ नूतन इनाम करार करून देऊन चालविला पाहिजे, म्हणोन, त्याजवरून, मनास आणितां, तुम्हीं बहुत दिवस स्वामिसेवा एकनिष्ठपणे केली, कुटुंबवत्सल आहां, तुमचे चालविणे अवश्यक जाणोन, तुम्हांवरी कृपाळू होऊन, मौजे मजकूर खेरीज मुकासा करून, स्वराज्य व मोगलाई एकूण दुतर्फा, देखील सरदेशमुखी, तुम्हांकडे ब। ॥ दिला आहे. तो कुलबाव, कुलकानु, हल्ली पट्टी व पेस्तर पट्टी, जल-तरू-तृण-काष्ठ-पाषाण-निधि-निक्षेप-सहित, खेरीज हकदार व इनामदार करून, दरोवस्त, तुम्हास कुटुंबाचे योगक्षेमार्थ नूतन इनाम करून दिला असे. तरी मौजे मजकूर सदरहू प्रमाणे तुम्ही आपले दुमाला करून घेऊन, तुम्ही व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें इनाम अनुभवून सुखरूप राहाणे. जाणिजे छ १६ जिल्काद ( मार्ग. शीर्ष वद्य द्वितीया ) आज्ञा प्रमाण. परिशिष्ट सत्ताविसावे, सांगवी गांव इनाम. राजश्री जयवंतराव यशवंत उपनाम पानसी गोत्र मुद्गल सूत्र आश्वलायन जोशी कुळकर्णी मौजे सोनोरी त॥ कहेपठार प्रांत पुणे गोसावी यांसः-- सेवक माधवराव नारायण प्रधान, नमस्कार, सुमा सलाम समानीन मया व अलफ शके १७०४ शुभकृत नाम संवत्सरे. तुम्हीं हुजूर कसबे पुणे येथील मुक्कामी येऊन विनंति केली की, आपण वहुत दिवस स्वामिसेवा एकनिष्ठपणे केली, त्यास आपली मातुश्री भीमातिरी राहाणार यास्तव त्यांचे सत्कालक्षपानिमित्य स्वामींनी कृपाळू होऊन