पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४ पानसे घराण्याचा इतिहास. परिशिष्ट विसावें. कासुर्डी येथील इनाम जमीन शके १६८९ आज्ञापत्र. निळकंठ महादेव, ताहा मोकदम मौजे कासुङ तर्फ सांडस सु॥ समान सीतैन मया व अलफ. कृष्णाजी माधवराव, भिवराव यशवंत, व्यंकटराव केशव, महिपतराव लक्ष्मण व रामराव लक्ष्मण पानशी यांस, एक चाहूर जमीन इनाम देणे. त्यापैकी अर्धा चाहूर मौजे मजकूरपैकी दिली आहे. त्याची इनाम-पत्रके पाहून हे आज्ञापत्र सादर केले आहे. तरी पानशी याजकडे इनाम वंशपरंपरेने चालविणे. परिशिष्ट एकविसावे, मौजे जेजुरी येथील इनाम जमीन. { शके १७०० विलंबी नाम संवत्सरे माघ शुद्ध तृतीया सु॥ तिसा सवैत मया व आलफ. छ १ मोहरम रोजी, श्रीमंत माधवराव नारायण प्रधान यांनी माधवराव कृष्ण व भिवराव यशवंत पानशी यांना १६ विघे मौजे जेजुरी येथे जमीन इनाम करून दिली. परिशिष्ट बाविसावे, सावरदरी येथील सरदेशमुखी व सरपाटीलकी इनाम. राजश्री भिवराव यशवंत उपनाम पानसी गोत्र मुद्गल सूत्र आश्वलायन गोसावी यांसः अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य ...... प्रति सगुणाबाई दाभाडे दंडवत विनंती, उपरी येथील कुशल जाणून स्वकिये लिहीत जाणे विशेष. तुम्ही मौजे तळेगांव त॥ चाकण येथील मुक्कामी येऊन विनंती केली की, आम्ही आपले सरकारचे कामकाज बहुत दिवस करीत आलों, याजकरितां कुटुंबाचे योगक्षेमार्थ कांहीं नूतन इनाम करून दिले पाहिजे. त्याजवरून मनास आणतां तुम्ही आमचे सरकारची सेवा एकनिष्ठपणे केली आणि तुम्ही कुटुंबवत्सल तुमचे चालविणे अवश्यक जाणून तुम्हांवरी कृपाळू होऊन आम्ही आपले वतन बाब पैकी मौजे सावरदरी त। चाकण प्रांत जुन्नर येथील सरदेशमुखी हे दोन अंमल दरोवस्त इनाम: तिजईसुद्धां, साल मजकुरापासोन इनाम करार करून देऊन इनाम-पत्र दिले असे; तरी तुम्ही व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें सदहूँ दोन्ही अंमलचा अनुभव घेऊन सुखरूप राहाणे. यास कोणी आमचे वंशींचें दिकत करील, त्यास श्री कुलदेवतेची शफथ असे. बहुत काय लिहिणे जे छ ५ माहे सवाल सुमा समान सवैन मया व आलफ. शके १६९९ हेमलंबी नाम संवत्सरे कार्तिक शुद्ध षष्टी.