पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्टें. १९३ परिशिष्ट सतरावें. सोनोरी गांव इनाम . श्रीमंत माधवराव नारायण प्रधान यांनी कृष्णाजी माधवराव व भिवराव यशवंत . यांस शके १६९९ हेमलंबी नाम संवत्सरे, पुरंदर मुक्कामी, कुटुंबाचे योगक्षेमार्थ, सोनोरी, गांव, खेरीज मोकासा करून वंशपरंपरेनें इनाम करून दिला. परिशिष्ट आठरावे. सावरदरी गांव इनाम राज्याभिषेक शके १०३ हेमलंबी नाम संवत्सरे ज्येष्ठ शुद्ध १० भानुवासरे श्री राजाराम छत्रपति स्वामी यांनी माधवराव पंडित प्रधान यांसी आज्ञा केली की, माधवराव कृष्ण व भिवराव यशवंत पानसी राहाणार सोनोरी तर्फ कन्हेपठार यांनी किल्ले सातारा येथे येऊन विनंति केली की, आम्ही स्वामींचे राज्यांत एकनिष्ठपणे सेवा केली, कटुंब-वत्सल, सबब योगक्षेमार्थ माधवराव पंडित यांनी आपले वडिलांस मौंजे सावरदरी तर्फ चाकण प्रांत जुन्नर हा गांव खेरीज मुकासा करून इनाम दिला, तो अनभवीत आहोत. त्यासी महाराजांनी कृपाळू होऊन नूतन इनाम करून दिला पाहिजे. वर स्वामी यांनी एकनिष्ठ सेवक म्हणोन सदरचा गांव वंशपरंपरेनें इनाम करून इनामपत्रे दिली. पशिष्ट एकोणविसावे, सुतोडा परगण्याचा जहागीर अंमल, शके १६९९ फाल्गुन शुद्ध ११ श्रीमंत माधवराव नारायणराव प्रधान यांचे देश पांडे पे॥ सुतोडा सरकार दौलताबाद यांस आज्ञापत्र. मोगलाईतून कबीर महंमद पातशाही बक्षी यास दहा हजाराची जहागीर होती. त्यास पेशजी न निजामअल्लीखान बहादूर यांजपासून साठ लक्षाची जहागीर सरकारांत घेतली. त्यांत न्याना सदर दहा हजाराचा जहागीर सरकारांत दिल्ही. ती सरकार कबीर महमद याजकडस हाता ता दूर करून, साल मजकूरपासोन , , यशवंत यांजकडेस राऊतांचे सरंजामास जहागिरीचा अंमल करार । अंमल सुरळीत करणे. छ ९ सफर सु॥ समान सवैन मया व अ १३