पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९३ पानसे घराण्याचा इतिहास. पलें, द्यावी लागतील, याकरितां हुजूरूनची शिके कट्यार सामानासुद्धां वहिरजी बोडिंगा व जानोची पवार खिजमतगार याजबराबर देऊन तुम्हांकडे पाठविली आहे. घेऊन मसलत संबंधे कागद पत्रावर शिक्के करीत जाणे, आणि याच खिजमतगाराजवळ बाळगावयासी देऊन शिके कट्यार पावल्याचा जाब पाठविणे, म्हणान. छ १७ रमजान सु॥ सवा सबैन मया व अलफ ( आश्विन वद्य पंचमी शके १६९८ ). , परिशिष्ट सोळावे, गंगापूर गांवच्या इनामाची सनद. राजश्रीयाविराजित राजमान्य राजश्री रघुनाथराव नीळकंठ स्वामी गोसावी यांसीः पोष्य माधवराव नारायण प्रधान नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणान स्वकीय लिहीत जाणे, विशेषराजश्री माधवराव कृष्ण व श्रीपतराव कृष्ण पानसी निसबत तोफखाना यांनी विनंति केली की, * पांडुरंगराव गोविंद यांस फौजसुद्धा कर्नाटक प्रांती पाठविले. ते समयीं डंबाळकर देसाई सरकार लक्षांत नव्हते. याजकरितां डंबाळकरांकडील ठाणीं सरकारांत घ्यावयाबद्दल गदक परगण्यांत सरकारची फौज येऊन डंबाळकरांकडील मौजे हिरेहाळ येथे ठाणे वसावयास मोर्चे लाविले. तेव्हा आपले तीर्थरूप कृष्णाजी माधवराव यांस मोर्चात कपाळास गोळी लागून, सन सेवा सबैन ( शके १६९९ वैशाख ) त ठार पडले. पुढे डंबाळकर देसाई सरकारांत रूजू जाल्यावर, आपल्यास इनाम गांव, एक हजार रुपयांचा, कमाल आकाराचा, डंबाळकर देसाई याने आपले देशकतीपैकी द्यावा. याप्रमाणे राजश्री परशुराम रामचंद्र यांचे विद्यमाने बोलण्यात आले. त्यास, कराराप्रमाणे गांव आपले हवाली व्हावा, तरी डंबाळकरांचे देशकतीचा अंमल फत्तेअल्लीखान याने घेतला, त्याजमुळे गांव हवाला जाहला नाही. हल्ली देशकतीचा अंमल सरकारांत आला. यास्तव पहिल्या कराराप्रमाणे गांव करार करून दिल्हा पाहिजे म्हणोन. त्याजवरोन कृष्णाजी माधव यांस मोर्चात गोळी लागून ठार पडले, याजकरितां त्यांचे पुत्र उभयतां मशारानिल्हे यास एक गांव हजार रुपयांचे कमाल आकाराचा डंबाळकरांचे देशकतीपैकीं इनाम यावयाचा पेशजी बोलण्यात आला आहे; त्याप्रमाणे मौजे गंगापूर परगणे गदक हा गांव डंबाळकरांकडील देशकतीचा सालमजकुरापासीन एक हजार रुपयांचे कमाल आकाराचा इनाम द्यावयाचा करार करून, हे सनद तुम्हांस सादर केली आहे. तरी मौजे मजकूर । गांव यांचे हवाला करून आकार लिहिल्याप्रमाणे त्यांचे नांवें इनामखर्च लिहीत जाणे. जाणिजे छ १९ जिल्काद. सु॥ सन सलाम तिसैन मया व अलफ, बहुत काय लिहिणे. हे विनंति ( शके १७१४ ).