पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्टें. १९१ कहेपठार प्रांत पुणे यासी आज्ञा केली ऐसीजे. राजश्री माधवराव कृष्ण व भिवराव यशवंत उपनाम पानशी गोत्र मुद्गल सूत्र आश्वलायन यांनी किल्ले सातारा येथील मुक्काम स्वामसन्निध येऊन विनंती केली की, आपले वडिलांनीं मौजे सोनोरी त॥ मजकूर येथे देवालय बांधोन श्री लक्ष्मीनारायण व रामचंद्रजी व विठोबा देव यांची नूतन स्थापना केली आहे. त्याचे पूजा नैवेद्य व नंदादीपाचे खर्चाबद्दल राजश्री माधवराव पंडित प्रधान यांनीं मौजे मजकूर हा गांव किल्ले वज्रगडाकडे सरंजाम होता तो दूर करून, खरीज मुकासा करून, स्वराज्याचा अंमल व मोगलाई एकूण दुतर्फा दोबस्त सरदेशमुखी सुद्धा कुलबाव कुलकानु हल्ली पट्टी व पेस्तर पट्टी देखील इनाम तिजाई जल-तरु--तृण-- काष्ठ-पाषाण-निधी--निक्षेपसहित, खेरीज हकदार व इनामदार करून सन सीत सबैनांत ६१० मोहरमी नूतन इनाम देऊन पत्रे करून दिली. त्याजप्रमाणे गांव श्रीकडे चालत आहे. ऐशीयास महाराजांनीं इनाम करून देऊन चालविला पाहिजे. म्हणोन विदत केले. त्याजवरून मनास आणून श्रीची पूजा, नैवेद्य व नंदादीपाचा खर्च चाला. विणे अवश्यक जाणून मौजे मजकूर हा गांव हुजुरून सदर्दू प्रमाणे इनाम करार करून दिल्हा असे, तरी तुम्ही यांसी व यांचे पुत्र-पौत्रादि वंशपरंपरेनें इनाम चालविणेगांवचा आकार होईल तो श्रीचे पूजा, नैवेद्य व नंदादीपास खर्च करीत जातील. प्रति. वर्षी नवीन पत्राचा आक्षेप न करणे. या पत्राची प्रती लेहून घेऊन हे पत्र भगवट यासी याजवळ परतन देणे. जाणिजे. पशिष्ट चवदावें. मौजे सावरदरी येथील व्यापारी पेठ वसाहत. आज्ञापत्र, पंतप्रधान, ताहां मोकदम मौजे सावरदरी तर्फ चाकण प्रांत जुन्नर येथे भिवराव यशवंत पानशी, हे गांवालगत खुली जागा पाहून, पेठ व्यापारी, उदमी, बेपारी, व्यवसाई पेठ वसविण्यास आज्ञा केली. पेठेत थळमोड, थळभरीत, शिंगाशिंगोटी बैठकीचीं पांच सालें, हांसील माफ केला आहे. तरी पानसी पेठ वसवतील त्यास पांच साल हांसिलाचा तगादा न करणे. सु॥ अर्ब सीतैन मया व अलफ ( शके १६८५), पशिष्ट पंधरावे. भिवराव पानसे यास मुतालकी. भिवराव यशवंत यांचे नांवें सनद कीं, तुम्हांस तोतयांचे पारिपत्यास बराबर फौज देऊन पाठविले आहे; त्यास मसलत संबधे कोंकणांत किल्लयास वगैरे कौल, सनदा,