पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास. माधव ठेऊन, आम्ही पुढे रवाना जहालों. श्रीमंतहि एक दोन दिवशी, मुरारजी घोरपडे यांस निरोप देऊन, सत्वरच येतील. तोफखाना यंदा मुतलावीस छावणीस राहणार. तेथे जिरंजीव रावजीस महिना पंधरा दिवस लागेल. चिरंजीव बाबा, आम्ही, एक दिवस मुतलावीस राहून पुढे जाऊ. आपले मंडळी, ती भाऊ मलबा वापूपैकीं, आबा", कोणीं छावणीस राहिले नाही. तिघांतून कोणी राहण्याची निकड फार होती. कांहीं चिंता न करणे. आशीर्वादं. परिशष्ट अकरावें. मौजे दिवे येथील इनाम जमीन शके १६९१ विरोधी नाम संवत्सरे आश्चिन व॥ १ रोजी कृष्णाजी माधवराव व भिवराव यशवंत जोशी, कुलकर्णी मौजे दिवे यांस श्रीमंत राजेश्री माधवराव नारायण पंडित प्रधान यांनी योगक्षेमार्थ नूतन इनाम जमीन विघे तास मौजे मजकूर पैकी देऊन आज्ञापत्र करून दिले. पाराशष्ट बारावें. मौजे दिवे येथील इनाम जमीन ( २ ). शके १६९१ विरोधी नाम संवत्सरे. राजश्री शामराव जगजीवन व मल्हार जगजविन पानसी राहणार मौजे सोनोरी यांनी श्रीमंत माधवराव पंडित प्रधान यांस पुणे येथे येऊन विनंती केली की, आम्हीं स्वामीचे सेवा एकनिष्ठपणे केली. कुटुंबवत्सल आहों. आमचे स्वामीने चालविले पाहिजे. त्यावरून श्रीमंतांनीं मौजे दिवे येथे गांवचे हद्दीत पंधरा बिघे जमीन वंशपरंपरेनें इनाम करून दिली. पशिष्ट तेरावें. मौजे वनपुरी गांव इनाम, स्वतिश्री राज्याभिषेक शके १०३ हेमलंबी नाम संवत्सरे जेष्ठ शुद्ध १० भानुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजाराम छत्रपती स्वामी यांनी मोकदमानी मौजे वनपुरी त॥ ३ बाबा-जयवंतराव यशवंत. ४ मलबा बापू-मल्हार जगजीवन. ५ आवा-कृष्णराव माधव,