पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्टे. १८९ दूर करून, पंधरा बिघे जमीन मशार निल्हेस नेमणूक करून दिल्हे आहे. त्याप्रमाणे चालते. या शिवाय साल मजकुरीं, मौजे कालंगवाडी संमत निंब येथील पड जमीन । वेड्यास वजा पडली आहे. त्यापैकी बिघे ४१० देणे, म्हणोन सनद सादर जहाली । आहे. त्यावरोन हैं पत्र तुम्हांस लिहिले आहे. तरी कालंगवाडीचे पड जमिनीपैकीं । जमीन बिघे ४१० मशारनिल्हेचे दुमाला करणे. रवाना छ २८ रमजान सुरू सन समान सितैन मया अलफ बहूत काय लिहिणे हे विनंती ( हे पत्र शके १६८९ माघ वद्य अमावास्येचे आहे ). --- पशिष्ट नववे, ( पत्र चवथे ) आज्ञा पत्र राजश्री पंत प्रधान, तांहा, मोकदम मौजे किकवी संमत निंब प्रांत वाई सु॥ समान सितैन मया व अलफं. रा. विठ्ठल राम पानसी यांस मौजे मजकूरी जमीन विघे ४॥ गुदस्ता नेमून देऊन किल्ले वंदन येथील बेहड्यास करार करून दिले आहेत ऐशीयांस सदरहू जमीन मशारनिल्हेकडे सुरळीत चालविणे. जाणिजे छ २९ रमजान आज्ञा प्रमाण. ( हे पत्र शक १६८९ फाल्गुन शुद्ध प्रतिपदेचे आहे. ) परिशिष्ट दहावें. निजगळ येथील लढाईचे बातमी पत्र, चि. विजयीभव रा. रा. आप्पा' व राजवा यास वैशाख व॥ ७ शके १६९२ मुकाम शिरे येथून ( भिवराव पानसी यांचे पत्र). समस्त मंडळी सुखरूप आहेत. इकडील वर्तमान कीं, श्रीमंतांनी निजगळ किल्ला हल्ला करून घेतला. आमची सर्वांची खैर झाली. राम तोफ फुटून श्रीमंत नारायणराव यांचे हातास चाटती गोळी लागली. खेर जाहली. सांडणी स्वाराबरोबर पत्र पाठविले. त्या. वरून समजले असेल. रा. त्र्यंबकराव मामा, हुजूरची फौज आठ हजार, गोपाल रास्ते, आनंदराव गोपाळ याप्रमाणे छावणीस ठेवून, कारखाना पांच तोफा आनंदान | १ आपा-विश्वासराव यशवंत. २ राजबा-पुरुषोत्तम यशवंत.