पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८८ पानसे घराण्याचा इतिहास. परिशिष्ट सहावें. .. मौजे खामगांव ( टेक ) येथील इनाम. शके १६८२ आश्विन शुद्ध द्वादशी. सु॥ इहिद्द सितैन मैया व अलफ रबिलावल छ ११ रोजी श्रीमंत बाळाजी बाजीराव प्रधान यांनी, कृष्णाजी माधवराव, भिवराव यशवंत, व्यंकटराव केशव, महिपतराव लक्ष्मण व रामचंद्र लक्ष्मण पानसी यांना मौजे खामगांव ( टेक ) या गांवीं अर्धा चाहूर जमीन इनाम करून दिली आहे, जाणजे, आज्ञा प्रमाण. परिशिष्ट सातवें. | ( पत्र दुसरे.) राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री सखाराम भगवंत गोसावी यांसी, पोष्य माधवराव बल्लाल प्रधान, नमस्कार, विनंती, उपरी येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहीत जाणे, विशेष विठ्ठल राम पानसी यांची असामी किल्ले वंदनास होती, त्यास साल मजकरी किल्ला तुमचे निसवतीस दिला. तेव्हां त्यांस बिघे ८१५ जमीन देऊन आसामी दूर केली. त्यास सदरहू ८१५ जमीन बेड्यास नेमून दिली आहे. त्याशिवाय मौजे कालंगवाडी संमत निंब पैकी पड जमीन बेड्यास वजा घातली आहे. त्या जमिनीपैकी जमीन बिघ ४१० हल्लीं करार करून दिली असे. तरी पेशही ४१५ बिघे जमीन दिली आहे; त्याशिवाय, सदरहू ८१० विघे साल दरसाल चालविणे. जाणिजे छ ३ रबिलावल सु॥ सबा सितैन मया व अलफ, बहूत काय लिहिणे हे विनंती ( हैं पत्र शके १६८८ च्या श्रावणांतील आहे ). परिशिष्ट आठवें ( पत्र ३ रे ) राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री चिटकोपंत स्वामी गोसावी यांसीः-पोष्य सखाराम भगवंत नमस्कार, विनंती उपरी, येथील कुशल जाणोन स्वकीये लिहिणे, विशेष. राजश्री विठ्ठल राम पानसी यांची असामी किल्ले वंदनाकडे होती. ती सरकारांतून