पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८६ पानसे घराण्याचा इतिहास. - वरील प्रमाणे एकमेकांचे सहीचे कागद पुरंदरे यांचे समक्ष एकमेकास स्वदस्तूरचे करून दिले. परिशिष्ट तिसरें. मौजे गिव तालुके इंदापूर जिल्हा पुणे हा गांव इनाम व मौजे शेटफळे येथील जमिनी इनामः खंडो शिवाजी पानशी यास, शाहू छत्रपति स्वामी यांनी कृपाळू होऊन कुटुंबाचे योगक्षेमार्थ गिर्वी गांव व कसवे वावडे येथे एक चाहूर जमीन व मौजे शेटफळे येथे अर्धा चाहूर जमीन इनाम दिली. सदरचा गांव व जमीन, स्वराज्य व मोगलाई एकूण दुतर्फा इनाम, तिजाई व वावती, सरदेशमुखी व साहोत्रा, हल्ली पट्टी व पेस्तर पट्टी, जल-तरू-काष्ट-पाषाण-निधि-निक्षेपसहित, खेरीज हकदार, कुलबाव, कुलकानु, दरोबस्त इनाम, महाराजांनी छ ५ जमादिलावल, सन सलाम बैन मया व अलफ. ( शके १६६४ आषाढ शुद्ध अष्टमी ) रोजी दिला. परिशिष्ट चवथे. सोनोरी येथील इनाम ज़मीनः । मौजे सोनोरी येथे श्रीमंत बाळाजी बाजीराव प्रधान यांनी माधवराव शिवदेव, यशवंतराव लक्ष्मण, केशवराव लक्ष्मण, महिपतराव लक्ष्मण व रामचंद्र लक्ष्मण यांना योगक्षेमार्थ पंधरा बिघे जमीन छ २९ रबिलावल सु॥ अब खमसैन मया व अलफ रोजी इनाम दिली ( शके १६७५ माघ शुद्ध प्रतिपदा ). परिशिष्ट पांचवें, सावरदरी येथील निम्मे मोकदमी. शके १६८८ व्ययनाम संवत्सरे, कृष्णाजी माधवराव व भिवराव यशवंत ये बीन लक्ष्मण माणकेश्वर पानसी यांनी, हुजूर कसबे पुणे येथे येऊन श्रीमंत माधवराव बल्लाळ पंडित प्रधान यांना विनंति केली की, मौजे सावरदरी येथील दरोवस्त मोकदमीपैकी,