पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्टे. १८५ संकटांतून त्यास सोडविलें.वरील प्रमाणे जयपत्र घेतल्यावर गांवास परत आले. नंतर रखमाजी बापूजी व बाबाजी बापूजी यांस दिव्य करण्याचे काम जो खर्च जाहला त्याची वांटणी मागितली. त्यांनी खर्च देण्यास सामर्थ्य नाही. तुम्हीं श्रम, मेहनत व खर्च केला आहे, तरी सर्व उत्पन्न तुम्हीं खावे असे सांगितले व त्याप्रमाणे त्यांनी स्वसंतोघाने लिहून दिले. पुढे ६०-६५ वर्षांनी निंबाजी पानसी यानी वतनासंबंधानें पूर्वी जाहलेल्या खर्चाचा हिस्सा घेऊन आमचे वतन आम्हांस द्यावे म्हणोन तंटा करण्यास आरंभ केला व दिवे येथे १-२ वेळां व वाघाली तर्फ हवेली येथे पिलाजी जाधव यांचे समक्ष १-२ वेळां तंटा तोडण्यासाठी बैठिकी भरावल्या. परंतु काही उपयोग जहाला नाहीं. नंतर बाबाजी मोरेश्वर व संभाजी माणकेश्वर पानसी यास परभारे एकटे गांठन त्यांस दाखवून व शिवाय जाधवांचे वजनावर निंबाजीपंतानें जोशी कुलकर्णपणांत आपले हिश्याबद्दल लिहून घेतले. हे वाकीचे भावास समजल्यावर त्यांनी पुरंदर मुकाम बापुजी श्रपित हकमाकडे या बाबत तक्रार केली. त्यांनी निकाल होईपर्यंत उत्पन्न जप्त केले. पुढे बरेच दिवसपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागला नाही. - पुढे भुतपंतांनी मिळविलेली निरथडीचे पांच गांवांतील वतने जिवाजी साबाजी, महादाजी चिंतामण, खंडो नागनाथ, कान्हो केशव पानसी हे दोन पिढ्या खात आहेत, त्याचे वांटणी संबंधाने सातारा येथे नारो शंकर पंतसचिव जिल्हेदार यांस भेटून त्यांचे समोर तक्रार केली. त्यांनी मौजे चांदक प्रांत वाई ही जागा वादाचा निकाल करण्यासाठी ठरविली. त्या वेळी महादाजी चिंतामण पानशी यांनी सांगितले की, परभणे यासी वाद करून शिरवळ मुक्कामी दिव्य केले; त्याबद्दलचा खर्च व्याजासुद्धां देणे व आपला हिस्सा घेणे. एकंदर खर्च पन्नास होन जाहले आहेत. तो दिल्यावर तंट्याचा आपसांत निकाल झाला. परंतु सोनोरीचे तंट्यामुळे एकंदर तंटा तसाच अपरा राहिला त्यावर लक्ष्मण माणकेश्वर हे श्रीमंत राजश्री बाजीराऊ पंडीत प्रधान याजकडेस मौजे खडे राजोरी प्रांत मिरज येथे येऊन फिर्याद केली. त्यांनी मल्हार तुकदेव पुरंदरे व महादाजी आबाजी पुरंदरे देशपांडे कर्यात सासवड यांस पंच नेमून कज्याचा निकाल करण्यास सांगितले. आपसांत निकाल झाल्यास उभय पक्षीं उत्तम अस पुरंदरे यांनी सांगितल्यावरून पानसी भावांनी एकत्र बसून निकाल केला तोः १ सोनोरी गांवचे कुलकण विसाजी परशुराम याचे वंशजानी खावे. व त्यांनी आपले बंधु रामजी परशुराम व कृष्णाजी परशुराम यांचे हिश्यांचे त्यांना द्यावे. १ सोनोरी गांवचें ज्योतिष अर्धे निंबाजी पानसी यांनी खावें व अर्धे विसाजी परशुराम, कृष्णाजी परशुराम व रामजी परशुराम यांनी खावें. ११ भोळी, तोंडल, गुणंद व लोणी येथील जोशी कुलकर्णपणाची वतने परसाव्यांचे. वंशजांनीं खर्च केल्यामुळे, निंबाजीचे घराण्यांत एक चतुर्थांश राहिलीं व बाकीचीं परसाव्याकडे आली.