पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૨૮૪ पानसे घराण्याचा इतिहास. ‘गोविंद विश्वनाथ यांनी दरबार खर्च करून जानोजी मजकुरास सोडविले. याकरिता त्याने व समस्त गांवकरी यांनी गोविंद विश्वनाथ यास सदरहू दरवार खर्चाचे ऐवजी तरटी ( शेताचें नांव ) चे शैत, गांव निसबतीने जमीन डाग रूके ४६ चा इनाम करून दिल्हे आहे. ते ही तुम्ही आपले पुत्र-पौत्रादि वंशपरंपरेनें अनुभवत जाणे. सदरहू जमिनीचा राजभाग होईल तो गांवकरी यांनी तुम्हांस शेत दिल्हे ते समय -पत्र लेहून दिल्हे आहे, त्याप्रमाणे गांवकरी देतील. गांवक-यांच्या कराराप्रमाणे सदरहू शेत अनुभवून सुखरूप राहाणे. शके ६८ दुर्मती नाम संवत्सर, फालगुन शुद्ध चतुदेशी, मंदवासर सुरू सन इसन्ने आवैन मया व अलफ येविषयी पत्रे छ १७ सफर :- १ मोकदम मौजे दियें व सोनोरी १ मुख्य पत्र १ देशमुख देशपांडे १ देशाधिकारी परिशिष्ट दुसरें, महाराज शहाजीराजे यांनी शके १६६० कालयुक्त नाम संवत्सरे कार्तिक शुद्ध १३ इंदुवालरीं महजर करून दिला त्यांतः बाबाजी निंबाजी पानसी यांस विसाजी परशुराम यांचे वंशांतील माणको विश्वनाथ वगैरे पांच भाऊ यांनी लेहून दिले की, सोनोरी येथील ज्योतिष कुळकर्ण पानसी यांचे पुरातन असून त्यावर रामजी बिन कृष्णाजी या नांवाचा गुमास्ता ठेविला होता. यांनी त्या वृत्या बळकावून ते त्यावर मालकी सांगू लागले. त्यावरून निंबाजी बाबाजी यांचे वडलि रखमाजी बापूजी, बाबाजी बापूजी, शिवाजी बापूजी व गोमाजी बापूजी या चौघांस वाद घालण्यासाठी मदतीस बोलाविले. त्यांनी आपली परिस्थिति वाद घालण्यासारखी नाहीं, सबब तुम्हीं वाद घालावा असे सांगितले. त्यावरून राजगड मुक्कामी राजे साहेबांचे दरबारी वाद सांगितला. त्यांनी मोहरी मुक्कामी अमृतेश्वरीं दिव्य करावे असे ठरविलें. दिव्य करण्याकरितां सर्वाच्या तर्फे गोविंद विश्वनाथ तयार झाले. अg प्रधानांचे कारकून व हुजरे यांचे समक्ष मोहरीं मुक्कामी दिव्य केले. त्यांत पानसी खरे ठरले. या काम सोनोरी येथील जानोजी विन बाऊजी काळा यांनी खोटी साक्ष पानशाचेविरुद्ध बाजूने दिली. सबब महाराज साहेब यांनी त्याची जीभ कापावी असा हुकूम केला. महाराजापुढे जीभ कापण्याचे वेळी गोविंद विश्वनाथ पानसी यांनी रदबदली केली व