पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्टें. १८३ कीं, मौजे मजकूरचे कुळकर्ण गिधवी यांचे. गिधवीं वाराणशीस जातां आपल्या वड़िलास पाय धोवून दान दिल्हे आहे. कुळकर्ण आपलें म्हणतो व आपणास मुतालिक ही म्हणतो. तरी आपण मुतालीक नव्हे, हे आपले मिराशी होय. मौजे मजकुरास गिधवी यांस व पानसी यांस संबंध नाहीं. ऐसे आपण दिव्य करीन. देव देईल तरी घेईल ऐसी तकरीर केली." सदरहू प्रमाणे हरदोजणीं तकरिरा केल्या. हरदोजण दिव्यास राजी झाले. मग सद्रहू प्रमाणे दिव्य करावें. ज्यास देव देईल त्याने घ्यावे, ऐसे आमचे स्थळीं झालें, मग शनवारी हाताची नखे हात धोवून हात पिशव्या घातल्या, सर्वच आदितवारीं पहिले प्रहरी तेल तूप आणून वेगळालें जोखून दोन्ही ताम्हने मांडून टकबंदी अडीच अडीच शेर तेल तूप ऐसे लावून एक एका ताम्हनांत घातलें, ऐशी ताम्हनें एक्याच पळामध्ये मांडून आंत रवे टाकून दोघांना बरावर दिव्य केले. त्यावरी मागती दोघांचे हातीं पिशव्या घालून ठेविले. सवेंच सोमवारी जाहला. मंगळवारी हात पाहिले. हुजूर आबाजी मोरदेऊ. या उपरी रामजी कृष्ण खोटा जाहला. अग्रवादी गोविंद विश्वनाथ पानशी दिव्या खरा जाहला. मौजे मजकूरचे कुलकर्ण गोविंद विश्वनाथ पानशीचें सांभाळीं केलें. रामजी कृष्णास पुढे लेकराचे लेकरी कुलकर्णास अगर जोसपणास संबंध नाहीं, ऐसा निवाडा जाहला. ते वख्ती सोनोरीकर व दिवेकर हजर होते. कळले पाहिजे व रामजीच्या जामीनदाराकडून गोविंद विश्वनाथाचे पैके दिव्याचे टके चारूके १९॥६ देविले पाहिजेत व रामजीपाशीं कुलकर्णाचे कांहीं कागदपत्र असतील ते रद्द असेत. राजगृहींचे व गोत पतीचे जे असतील ते कुळीं रद्द: असेत. तुम्ही या निवाडियाप्रमाणे त्यांचे कुलकर्ण सांभाळ करणे शके १५९० कोलकनाम संवत्सरे, माहोशुद्ध त्रयोदशी, बुधवार एकुण पत्र ओळीखेरीज तकरिरा १०० शंभर हे विनंती.' येणेप्रमाणे चार पत्रे आणन ती मनास आणितां निर्णय जाहली आहेत. याजकरितां स्वामी तुम्हांवरी कृपाळू होऊन हल्ली में नूतन पत्र करून दिल्हे आहे. त्याचे वंशोचा अगर गोत्र पुरुष कोणी असेल त्यास व रामजी गांवखंडेराऊ सोनोरांच्या कुलकर्णाकरितां भांडत होता तो दिव्य सुखें खोटा जाहला. त्याच्या वंशजास अगर गोत्र पुत्रास व पूर्वी दियाच्या व सोनोरीच्या वृत्तीस पाडांगळा उभा राहिला होता, ते समयीं तुमचा वडील विसाजी परशुराम पानशी याने म्हैसळला दिव्य केले. तेव्हां पाडांगळा खोटा जहाला, त्यावर खंडो मुरार जेजुरकर यांचे वंशीचा अगर त्याचा गोत्र पुत्र कोणी असेल त्यास हरदो गांवांशी संबंध नाहीं. पाडांगळ्यापाशीं व गांवखेडरावापाशीं वतन संबंध कागद असतील ते रद्द असेत. तुम्ही आपले पुत्र पौत्रादि वंशपरंपरेनें हर गांवांचें ज्योतिषपण व कलकण अनभवन सुखरूप राहणे, व जानोजी बिनहोजी काळा विरादर मोकदम मौजे सोनोरी याने रामजी कृष्ण गांवखंडेराऊ वतनदार खरा म्हणून लटकी गोही दिल्ही होती, याजकारितां महाराज राजश्री थोरले कैलासवासी त्याची जीभ कापीत होते. ते समयीं तुमचा आजा