पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ पानसे घराण्याचा इतिहास मालजी भापकर मौजे दियें ...१ नाना मांग ...१ जानोजी चौगुले मौजे दियें ...१ अजीज पत्र गोही साक्षीनिशीं | * थळपत्रे बेशमी श्रीसकळगुणसंपन्न सौजन्यसिंधुशरामणी परउपकार मूर्ति राजमान्य राजश्री राजमुद्रा व मोकदम शैटिये महाजन मौजे सोनोरी, तर्फ कन्हेपठार परगणे पुणे गोसावी यांस-राजमुद्रा व मोकदम व शेटिये महाजन महास्थळ महाप्रयेशिक सभा समर्थ मौजे मोहरी बुद्रुक तर्फ गुंजणमावळ सुरू सन तिस्सा सितैन अलफ. नमस्कार व अनुक्रमें रामराम विनंति उपरी, राऊळाचे गांवींचे कुळकर्ण अग्रवादी गोविंद विश्वनाथ पानशी व पश्चिमवादी रामजी कृष्ण गांवखंडेराऊ यांमध्ये मौजे मजकूरच्या कुळकर्णाचा कथला होता. याबद्दल हरदोजण राजश्री राजेसाहेब यांस राजगडास भांडत गेले. त्याउपरी राजेसाहेबी ही गोष्ट मनास आणून निवाडा करीत होते. याउपरी हरदोजण दिव्य करावयास कवूल जाहले. मग साहेवीं बराबर आवाज मोरेदेव देऊन आपला हातरोखा आपणास पाठविला की, गोविंद विश्वनाथ पानशी व रामजी गांवखंडेराऊ या दोघांस मौजे सोनोरीच्या कुळकर्णाबद्दल भांडण लागले आहे, त्यांस दिव्य करावे, ऐसा तह जाहला. हरदोजण दिव्यास कबूल झाले. तरी दोघांकडून दिव्य वेगळाले च करविणे. म्हणोन रोखा राजश्री आबाजी मोरदेऊ याबरोबर देऊन पाठविले. त्याउपरी तेथे दोघांनीं तकरिरा लेहून दिल्ह्या.

  • अग्रवादी गोविंद विश्वनाथ पानशी तकरीर केली की, मौजे सोनोरी, परगणे पुणे, येथील कुळकर्ण गिधवी यांचे, आपण:उपाध्ये गिधवी यांचे, त्याउपरी गिधवे वाराणशीस जावयास निघाले, आणि आपले वडिलांस पाय धोवून दिधले. याउपरी आपले वडील भट होते त्यांस लिहितां येत नव्हते याबद्दल कित्येक मुतालीक ठेवीत गेले. यावरी आपले वडील लेहूं शिकलीयावरी कुळकर्ण चालवू लागले याउपरी मुशाहिच्याबद्दल आपला चुलता लुखोबा घरीं रूसोन राहिला. मग रामजीचा बाप कृष्णाजी गाऊजी शेत करून बोवाडियाने होता. वस्ति सासवड असे. त्याउपरी कृष्णाजी मुतालीक करून ठेविला. यावरी आपला वडील चुलता मेला. त्यावरी कृष्णाजीने चालविले. या अलीकडे रामजी चालवत होता. त्यावरी दोन वेळां हटकलें, मग गैरहजीर झाला. आतां हल्ली आपण रामजीस हटाकले. त्यास रामजी म्हणतो की, कुळकर्ण आपलें, हें गिधवी यांचे हि नव्हे व तुमचे ही नव्हे म्हणतो, तरी हे लटके. हा आपला मुतालिक खरा. आपणास गिधवी यांनी पाय धोवून मिराशी दिधली आहे हैं खरें, आपली वृत्ति होय हे तकरीर केली. '
  • पश्चिमवादी रामजी कृष्ण गांवखंडेराऊ तकरीर केली ऐशीजे, मौजे सोनोरीचे कुळकर्ण आपली मिरास होय आपले वडिली पिढी दर पिढी, बाप, आजा व आपण खात येतों. ऐसे असतां हल्लीं गोविंद विश्वनाथ पानशी हा उभा राहिला आहे