पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्टे. १८१ सोनोरी निशाणी नांगर ...१ तिमनाक महार ...१ येस माळी मोज दिये ८०० प्रमाणे दानपत्र बार असे.

  • अजीज पत्र शके १५६० किलकनाम संवत्सरे, माघ वद्य प्रतिपदा, मंदवासर मुक्काम राजगड, ते दिवशीं गोविंद विश्वनाथ पानशी यासी रामजी कृष्ण गांवखंडेराऊ वस्ती कसबे सासवड सुरू सन तिस्सा तिसैन अलफ सन १०७८ कारणे अजीज पत्र लेहून दिल्हें ऐसें जे; मौजे सोनोरी, तर्फ कन्हेपठार, परगणे पुणे येथील कुळकर्णावर ‘तुमचे चुलते लुखो परशुराम यांनी आपल्यास मुतालक ठेविले होते. लुखबामध्ये व पाटलामध्ये मुशाहियाबद्दल कटकट झाली. याजकरितां आपले कारकीर्द पावेतों कुलकर्ण चालविलें कित्येक काजिये तुम्हांस बेइमान सांगितले. कागदपत्र ही मालुमातीचे आणित गेलों. त्यास तुम्ही आम्ही भांडत महाराजसाहेब यांजजवळ आलो. महाराजसाहेब हमशाही गोताचा व पांढरीच्या साक्षी मनास आणितां; गिधवे यांचे दोन्ही गांव मौजे मजकूर व मौजे दिये गिधव यांनी पानशी यास दान दिल्हे, आणि ते काशीस गेले. त्यावरून महाराज साहेबी हरदोजणांस दिव्य नेमून दिल्हें. मौजे मोहरी तर्फ गुंजणमावळ येथे दिव्य करावयासी पाठविले. तुम्हीं व आपण वेगळाले दिव्य केले. तुम्ही खरे झालेस. आपणास रवा लागला. खोटा जाहलों. मिरासी वेगळा देवें केलें. देवाघरीं व राजघरों व गोतघरीं खोटा जाहलों. तमाम खळके तुम्ही खरे म्हणोन टाळी पिटली. मग सभानायकी आपणांकडून तुम्हांस पत्र लेहून देविलें तें दिल्हें. तर सुखरूप लेंकरांचे लेंकरी तुम्हीं कुळकर्ण व ज्योतिषपण मौजे मजकूरचे खाणे. आपणांस व आपले वंशिज्यास व दाईज गोत्रजांस तुम्हांसी वृत्तीविषयीं भांडावयासी संबंध नाहीं. आपले घरीं वतनाविषयी कित्येक कागदपत्र असतील ते कुळरद्द असेल. सानीनहाल आपला कोणीं तुम्हांसी काजिया करील तर गोताचा अन्यायी, दिवाणाचा गुन्हेगार, तम्ही सव. रूप आपले वतन खाणे, हे लेहून दिल्हें. सही विनतपशील अजमार्से ओळी ३१ अस्सल पत्री.

गोही मुकुंद कान्हो देशपांडीये परगणे पुणे १ विठ्ठल पिलदेव सुभेदार प्रांत मावळ १ रंगो माणकेश्वर जोशी कुळकर्णी मौजे नारो बहिरव कुळकर्णी व जोशी मौजे बोपगांव परगणे पुणे ...१ बेलसर ...१ मोकदम मौजे दिये निशाणी नांगर...१ माणकोजी व मोराजी पाटील मोकदम वाघोजी वीर माने मौजे दियें ... १ मौजे सोनोरी निशाण नांगर बैजो मुकुंद कुळकर्णी मौजे मोहरी । येस माळी मेहेतर मौजे दियें बुद्रुक तर्फ गुंजणमावळ ...१ तुका महार ...१