पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૨૮૦ पानसे घराण्याचा इतिहास. परंपरेनें मोजे मजकूरचे कुळकर्ण व ज्योतिष खाऊन असावें. येणेप्रमाणे निवाडा झाला । आहे तर वर हुकूम निवाडा अंमल करणे, तालीक देऊन अस्सल पत्र गोविंद विश्वनाथ यासी परतोन देणे म्हणून महजर कैलासवासी स्वामीचा १

  • दानपत्र शके १५४९ प्रभवगाम संवत्सरे, अश्विन शुद्ध त्रयोदशी, भृगुवासर ते दिवशीं लुखावा परशुराम व विसाजी परशुराम पानशी कुळकर्णी व ज्योतिषी मौजे दियें कर्यात सासवड व मौजे सोनोरी तर्फ कन्हेपठार,परगणे पुणे यांसी रंगो त्र्यंबक व गणेश त्र्यंबक गिधवे, नमस्कार लेहून दिल्हे .ऐसे जे, आपले वडिलीं वेदमूर्ति लक्ष्मीधर भट पानशी यांस दोनी गांव ज्योतिष व कुळकर्ण दान दिल्हें. आमचे वडील काशीवास कराबयासी गेले. त्यास त्यांचे देहावसान भागीरथी-तीरी झाले. त्यास सांप्रत शके १५२७ रंगभट राख्ये तेथे आले. त्यांनी आम्हांस वर्तमान सांगितले की, तुमच्या वडिलांची वृत्ति : पानशी बळे च खात आहेत. हे तिसरी पिढी चालत आहे. दत्तेबा राख्या तिसी तुमचे वृत्तीबद्दल भांडला. त्यास लुखोवाने तोंडचे तोंडी मारला. त्यावरून आपण तुम्हांस वर्तमान सांगावयासी आलो. तुम्ही जाऊन आपली वृत्ति खाणे. वृत्तिसाठी संन्यास ग्रहण. थोडे वृत्ति संरक्षण करावें. ऐसा बहुत प्रकारे बोध करून आम्हांस इकडे पाठविलें. त्यास आपण येथे आलों, तुमची भेट झाली. तुम्हांस वर्तमान पुशिले त्यास तुम्ही आमच्या वडिलांचे नांवाचे व दस्तुरचे दानपत्र दाखविले की, आमचे वंशीचा अवलाद अफलाद कोणी तुम्हास वृत्तीच वाद सांगेल त्यास गोहत्येचे, मातृगमनाचे, सुरापानाचे, व ब्रह्महत्येचे पातक असे. तुम्ही लेंकराचे लेंकरी सुखी वृत्ति खाणे. आमचे अवलाद आफलादेस तुम्हांसीं भांडावयासी संबंध नाही. आपले वडिली लक्ष्मीधर भटाचे पाय धोवून दान दिल्हें. व दानपत्र लेहून दिल्हें. ते तुम्ही आम्हांस दाखविले. त्या आपणांस वडिलांचे पत्र प्रमाण झाले. त्यावर तुम्हीं बोलिलेस की, आपलेही पत्र करून देणे. त्यावरून हे पत्र तुम्हांस लेहून दिल्हें असे. सुखें लेकरांचे लेंकरी खाणे. आपली जे अवलाद आफलाद त्यास तुम्हांसी भांडावयाची गरज नाहीं. दोही गांवचे ज्योतिष, कुळकर्ण दरोवस्त सुखें खाणे. हे लिहिले सही. बितपशील रंगो त्र्यंबक गिधवे. ओळी सुमार २५ पंचवीस. सही,

गोही . . मौकदम मौजे दियें निषाणी नांगर ...१ पांडुजी वंजार मौजे दियें ...१ . मालजी भापकर दियें ...१ झिळा वरटा। नाइकजी विन मावजी पाटील ई बिन बलुजी पाटील काळे मोकदम मौजे गांव मेहेतर चांभार ...१ जानोजी चौगुले मौजे दिये व कुळवाडी मौजे सोनोरी ... ।१ ।। खोजी गाढवे कुळवाडी. मौजे सोनोरी १ भिका सुतार ...१ बहीर दरणा ...१