पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्टें. १७९ गांव, परगणे वाई व मलकाजी बिन वाघोजी कदम हल्लीं चाकर हुजुरात व गोहीदार सदरहू पैकीं मौजे मजकुराचे मोकदम व बलुते छ ०......राजानी मोहरीस पाठविले. तेथे मोहरीचे मोकदम व बाजे प्राश्नक लोक हमशाही गोत मिळोन दोघे वादी यांची उत्तरें मनास आणितां बोलिले वितपशीलः गोविंद विश्वनाथे सांगितले जे रामजी कृष्णे सांगितले जें. आपण गिधवे पहिले मिरासदार होते तेही मिरासदार गिधवी यासी व पानशी यासी आपल्या वडिलास मिराशी करून या मिराशीचा संबंध नाही. आपला आजा दिल्ही हे सत्य. व बाप आपण कुलकरण खात आलों में खरें. येणेप्रमाणे उत्तरें आयकोन गोहीदारांस पुशिले. गोहीदारी सदरहू लिहिले तेणेप्रमाणे साक्ष दिल्ही. यावरून रामजी मजकूर खोटा जाहला. या उभयतांपासून दिव्य करावे नलगे; ऐसे स्थळीथे प्राष्णिक वोलिले यावर आबाजी मोरदेव मलको हुजुरून पाठविले होते; हे व कोणी प्राष्णिक बोलिले जे, राजश्री...साहेब उभयतांस दिव्य करावयासी पाठविले आहे. यापासून दिव्य न घेतां दोघांचे भांडण दूर होत नाही. श्री देवावरी भार देऊन निवाडयाबद्दल स्थळास पाठविले आहे. ती देवापुढे व अग्नीपुढे । अकसकासास होणार नाही. दिव्यां जें निवडेल तैसें दोघी वर्ततील. ऐसे बोलोन । वेगवेगळालीं तपेली, वेगळाली ताम्हनें, व वेगळाली मंडळे व वेगळाली तेलें, तुपें एकसारखी व वेगळाले रवे एकसारखें वजन करून बराबरीच दिव्य करविलें. हरदोजणांचे शिरीं चीरपत्रं बांधोन मंडळे चालत आहे. आधीं गोविंद विश्वनाथे रवा काढून बाहेर ठेविला. गोविंद विश्वनाथ खरा झाला. रामजीने ताम्हनांत हात घालून रवा काढितां बोटे जळाली म्हणून रवा ताम्हनांतच टाकिला. पुरता रवा बाहीर काढिला नाहीं, वो भाजलीं; रामजी खोटा झाला. तेच समयीं तेथल्या लोकांस कळले. मग पिशवी घालन लखेटे करून तिसरे दिवशी मंगळवारी हातां पाहिले तो गोविंद विश्वनाथ खना झाला. रामजीची बोटें पोळलीं, तो खोटा जाहला. थळीचे निवाडयाप्रमाणे निवाडपत्र घेऊन, हरदो घेऊन राजगडास आले. हुजुरूनही तमाम खलके हात पाहिले तों गोविंद विश्वनाथ निर्मळ खरा झाला. यावरून मौजे मजकुराचे कुळकर्ण, ज्योतिषपण लेकरांचे लेंकरी औलाद अफदाल चालवणे, रामजीचे हात पहातांच पांच ही वो भाजली. तो खोटा झाला. मिराशी वेगळा देवें केला. रामजीस अगर त्याचे भाऊबंद वं दाईज गोत्रज असतील त्यांस मौजे मजकूरच्या कुळकर्णासी संबंध नाहीं, खोट तो दूर केला. अर्थाअर्थी संबंध नाही. येणेप्रमाणें निकाल झाला, त्यास हिंदू होऊन अन्यथा करील त्यास काशीमध्ये गोहत्या व ब्रह्महत्येचे पातक असे. मसल होऊन अन्य सारिखे करील त्यास मकेमध्ये सोर मारल्याचे दोजक असे. गांव खंडेराऊ कित्येक मालु मातीची व वकिलातीचे बळे कागद दिवाणांतील व गोताच कर घेतले असतील, ते कुळीं रद्द असेल. गोविंद विश्वनाथाने लेकरांचे लेंकरी औलाद आफलाद