पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૨૭૮ पानसे घराण्याचा इतिहास. मौजे आंबेडी १ वहीर दरणा १ मावजी मोकदम १ पीळ बरटा। १ भानजी कुलकर्णी याची आर्दास २ चांभार १ मारुती । १ महार। १ निसा ३ १ लक्ष्मी कुंभार १ जैवा न्हावी. | वहिरा धडसी २ महार १ तुळज्या १ परसा | १ नाना मांग १७ मौजे हिवरे, तर्फ कन्हेपठार आर्दासा पाठवून दिल्हा आपल्या नांगरानिशी १ लोणी काळभोर १ आळंदी | येणेप्रमाणे गोहीदारांस महारकुंड व चांभारकुंड काढून मांगी महारीचे वस्त्र तुमचे शिरीं आपलाले पूर्वज स्मरोन जैसे यथार्थ असेल तैसे सांगणे, म्हणून शपथ घातली, यावर गोहीदारीं गोही दिधली जे, मौजे मजकुराचें ज्योतिष व कुळकर्ण गिधवे मिरासदार होते. त्यांहीं पानशी यांच्या वडिलांस मिरास लेकराचे लेकरी दिल्ही, हे आपणास ठाव आहे. हे सत्य ऐसे. खेरीज जानोजी बोलिले. जानोजी विन वैजी बिरादर मोकदम मौजे मजकूर हा बोलिला कीं, रामजी गांवखंडेराऊ हा मिराशी कुळकर्ण। ऐसे आपला बाप वैजीने सांगितले होते. ते खरें, ऐशी गोही (साक्ष ) गुदरली व समस्ताजणांची एकच गोही गुदरली, आणि एकल्या जानोजीची निराळी गोही झाली. सदरहू गोही जाहली याबद्दल दोघांचाही कुसुर तुटावा याबद्दल हरदोजणास दिव्य नेमिलें. श्री अमृतेश्वर मुक्काम मौजे मोहरी बुद्रक तर्फ गुंजणमावळ तेथे दोघांनी वेगळाले दिव्य करावे. तपेली दोन व ताम्हणे दोन, रखे दोन तेल तूप एकसारखें वजन करून लावन बरावरीच दिव्य करावें. खरा होईल तो भिरास लेंकराचे लेंकरी खाईल. खोटा होईल तो मिराशी वेगळा. दोघांही खरे झाले तर दोघांहीं निमे (निम ) वांटून द्यावे. दोघे खोटे झाले तर दुरीच करावें, ऐसा तह होऊन दोघां वादीयांस पाशलें. सदरहू प्रमाणे राजी झाले. यावरी हुजरून आवाजी मोरदेव चिटणीस मिरासदार, मौजे चिमण