पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्टें. १७५ आपले नव्हे. त्यावरी आपले मनीं रखमाजीने विचारले की, त्र्यंबक विश्वनाथ सुभा चाकरी करीत असतां, संभाजी मोहिते याने धरिलें आहे. त्यामध्ये व नारो सुंदर मध्ये आकस आहे. या करितां इलाज न चले. व बैजी पाटील व रोमाजी दोघे एक होऊन आपणास जिवे मारतील. ऐसा विचार करून कागद मौजे दिवाच्या मोकदमाच्या नांवें ठाणां अर्जदस्त दिधली की, आपणांस व रामाजीस संबंध नाहीं. ऐसी अर्ज दस्त लेहून दिल्ही. त्यावर अफझलखानाचा गलबला झाला व अमीरउमराऊ नवाव शस्ताखानाचा गलबला झाला. मुलूख खराव पाडला. त्यावर मौजे मजकूरही खराब पाडले. पेस्तर मुलुखास कौल जाहला. जुजबी वसाहत झाली. तेच वख्ती आपण हजीर झालो. रामाजी गैरहजर झाला, तो औरंगाबादेस जाऊन बाकीजी भोसले यापाशी चाकर राहून वेजबी केली. ते वख्ती त्या नजीक मालुमती करून महाराज साहेबाचे व नारो सुंदराचे खुर्द खत होते ते दाखवून परवाना घेतला कीं, हरदोवादी यांची मनसुफी बरहक करणे, त्यावरून परगणे मजकुरास मशार निल्हे शामजी पंडित गुमास्ते दिवाण व कानाजी पंडित गुमास्ते अमिनाचे ये हि परगणे मजकूरचे देशमूख व देशपांडिये यांनीं हमशाही गांवास खुर्द खते पाठविली कीं, पानशी याचा व रामजी गांवखंडेराऊ याचा मोजे मजकूरच्या कुलकर्णीचा अंमल कैसा आहे तो आपलाले इमान राखेन पूर्वज स्मरोन हक्क असेल ते लेहून पाठविणे. त्यावरून हमशाहीं गांवचे मिरासदार। आजस साक्ष साक्षीच्या लेहून पाठविल्या बितपशीलः कर्यात सासवड परगणे पुणे १ मौजे लोणी काळभोर तर्फ हवेली १ कसबा, येथील देशमुख, देशपांडे व स्थळकरी १ आळंदी तर्फ सांडस । मौजे दिवें ३ तर्फ कहे पठार परगणे पुणे = परगणे सुपे १ पिंपळे १ बाणपुरी आंबोंडी - सोनोरी बारा बलुते १ सुपे खुर्द कुंभार वळण यांनी लेहून पाठविलें कीं, मिरास पूर्वी दिवे व मजकूर येथील ज्येतिष व कल. कर्ण गिधवी यांचे. गिधवा यांनी पानशास मिरास करून दिली. त्यावरून कित्येक दिवस पानशी चालवीत असतां, दरम्यान सोनोरीच्या मोकदम्यामध्ये लुखाबा पानशी यामध्ये मुशाहिच्याबद्दल कटकट झाली. मग कृष्णाजी गांवखंडेराऊ वस्ती मौजे सासवड तेथे बावडी याने, दाणी यांनी आपल्या शेतावर ठेविला होता. लुखेाबा रूसीन राहिला म्हणोन लुखाबाचे मामा दाणी यांनी पानशी यासी म्हणून कुन (१ ) मजकूर