पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७६ पानसे घराण्याचा इतिहास. ठेविला. तो पानाशया मुतालीक होय. आपणास ठावके असे. ऐसे गोहीचे कागद आलियावर आपणास दुमाले चिट्टी दिधली. कुलकर्ण आपले दुमाले केले. मजर करावा तो देशमुख व देशपांडे औरंगाबादेस गेले, त्यांची वाट पहात आपला भाऊ मोरो विश्वनाथ पुण्यास राहिला. यावरी देशमुख व देशपांडे आले. त्यापाशी आपला भाऊ मोरो विश्वनाथ बोलिला कीं, साक्षीप्रमाणे आपणास महजर करून देणे. ते बोलिले की, आम्ही जे करू त्यास तुम्ही राजी आहां ऐसा कागद लिहून देणे, त्यावरून मोरो विश्वनाथ बोलिला जे साक्षीदार गुदरल्या आहेत; हल्लीं ज्योतिष खातो तसेच कुलकर्ण खाणे म्हणून महजर द्याल तर मान्य असो, अगर परस्थळास पाठवाल तर जाऊ. परंतु निवडलिया अमलास मोघम कागद मागतां, तो उगाच देववत नाहीं. यावरी रामाजी गोत मान्य करीना. आणि ठाणांतून गैर हजर होऊन साहेबाचे शेवेश आला. हे तकरीर सही ” । | * तकरीर रामजी कृष्ण गांवखंडेराऊ यानें तकरीर केली जे, मौजे मजकूरचे कुलकर्ण आपले मिराशी आहे. आपला आजा गाऊजी, आपला बाप कृष्णाजी व आपण ऐसे कुलकर्ण कारकीर्द दरकारकीर्द खादले आहे. पलीकडे ठाव नाहीं. नाईक पाटील होता, तो आपणास मुशाहिरा नेदी, म्हणून त्यामध्ये व कृष्णाजी गाऊजी आपला बाप यामध्ये कटकट झाली. आपण पोट भरावयास गेलों. मागे लुखवाने कुलकर्ण चालविलें मागुती आपण येऊन कुलकर्ण चालवू लागलो. त्यावर कारकीर्द महाराज साहेब, रखमाजी पानशी कुलकण चालवीत होता. तो त्र्यंबक विश्वनाथाने ठेविला होता. तो आपणास महाराजांचे खुर्दखत आणिलें. तेणे प्रमाणे ठाणाचे खुर्द खत आणिले आणि रखमाजीस दूर करून कुलकण चालविलें. म्हणून तकरीर केली. सही” सदरहू दोघांच्या तकरीस मनास आणून दोघां वादी यांस म्हटले की, तुम्ही गोताला राजी असाल तर गोतांत पाठवू. अगर परस्थळास राजी असाल तर परस्थळास पाठवू. अगर हमशाई गांवीचे मोकदम व मोख्तेसर व मौजे मजकूरच मोकदम व बारा बलुते यांसी राजी असाल तर त्यांचे गोही वरून मनसुफी करून, जे गोष्टी तुम्हांस मानली ते सांगणे, यावरी रामजी गांवखंडेराऊ बोलीला की, पुणीयामध्ये आपणास मनसुफी करितां खोटें केले आहे, तरी साहेबी भले लोक वैसवून बरक निवाडा केला पाहिजे.. मग गोविंद विश्वनाथ यांस पुशिलें, तू कोणे गोष्टीस राजी आहे ? त्यावर गोविंद विश्वनाथ बोलिला जे जे गोष्टीस रामजी राजी असेल तेच गोष्टीस मान्य असे. ऐसे राजीनामे लेहून दिल्हे. यावर सभासदी हरदो जणांच्या तकरिराचे उत्तरें मनास आणितां, गाऊजी गांवखंडेराऊ रामजीचा आजा बुट्टा असतां, कृष्णाजी गाऊजी, रामजीचा बाप पानशी यांनी मुतालिक ठेविला. मौजे मजकूरच्या कुलकर्णीबद्दल ठेविला होता. त्यापलीकडे त्याचा कांहीं भोगवटा नाही. रामजी लहान होता. तो थोर जालीयावर महाराज साहेबांचे खुर्दखत आणिले. त्यामध्ये मालुमानी पांच पिढ्या कुलकंर्ण चालविलें,