पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ पानसे घराण्याचा इतिहास. कीं, नाईकजी पाटलामध्ये व लुखेावामध्ये कटकट झाली होती. ते दोघे मरोन गेले. आपण तुम्हांसीं कांहीं किलाफ धरीत नाही. आपण व तुम्ही मिरासभाऊ आहों. आपले कुळकर्ण व ज्योतिष सुखें खाणे. ऐसे समाधान केले. यावरी आपले वायें रामजीस म्हटले की, कुळकर्णाचे निसबतीचे कागद तुजपाशी आहेत ते समजाऊन मज देणे, अनमान असेल तर दादाजी कोंडदेव सुभेदार हकीम आहेत त्यांजपाशा चाल. यावरी रामजीने पाटलास म्हणोन आठ दिवसांची मुदत सांगोन मोईन केली जे, आठा दिवशी येऊन कागद समजाऊन देईन. ऐसा नेम करून ठाणांतून गांवास गेला. आणि रामजीनें हंस पाटिलाचा धाकटा भाऊ बैजी होता, त्यासी घरोवा करून शफत घेतली जे, तू मोकदमी करणे. आपण कुळकर्ण करीन. पानशी जोसपणों करितात तैसें करितील. त्यांचे कुळकण आपणास देणे. या तहास हंस पाटीलामध्ये व वैजी पाटीलामध्ये कसूर वाढविला आणि रामाजी कागद नेदी, तो गांव टाकून कर्नाटक प्रांत गेला. त्यावरी आपले वापें पाटलास कागद लेहून दिल्हा कीं, रामाजीस आठ रोजा नेम करून तुम्ही घेऊन गेला. त्यास बोलास पंधरावीस दिवस झाले कागद पाठविले नाहीत म्हणून लिहिले. शेवट हंस पाटील व रत्नो पाटील वैजीस म्हणत की, पानशी मिरासदार आहेत. आमची क्रिया गुंतली आहे की, याच्या हाते कुळकर्णाचे काम घ्यावे. आणि बैजी मजकूर म्हणे की, रामजीस हात धरावें. यावद्दल कुसूर वाढला. त्याकरितां आपला बाप गांवास गेला नाहीं. कोंकणामध्ये व्यापार करोन गेला. त्यावरी बैजीने मारा करून आपला भाऊ हंस पाटील जिवे मारिला. आपला ही बाप कोंकणांत मरोन गेला. आपण धाकटे नेणते होतो. ते जाणते जाहलों, त्यावरी कारकीर्द महाराज साहेब नारो सुंदरास हवाला पुण्याचा होता. त्यांची भेट घेऊन आपली हाकिकत सांगितली. त्यावरून ती ही कुलकर्णाची दुमाले चिट्टी दिधली. मग रखमाजी पानशी आपला गोत्रज कुलकर्ण चालवावयास ठेविला. तो कुलकर्ण चालवीत असतां, रामाजीने राजश्री महाराज साहेबास गलत मालुमात केली जे; मौजे सोनोरीचे कुलकर्ण आपली मिरास पांच पिढ्या खादले आहे. आणि पानशी खळेल करितात, म्हणोन सांगितले. त्यावरून महाराज साहेबी नारो सुंदर हवालदार परगणे मजकूर यांस. खुर्दखत दिधलें कीं, रामजी याची व पानशी याचा बरहक मनसूफी करणे म्हणून सादर झाले. त्यावर नारो सुंदर याने दोघे वादे व गांवचे मोकदम व मुख्तेसर बलुते व हमशाही गांवींचें गोत मिळवून मनसुफी करून निवाडा करावा तो केला नाही. व खुर्दखत कैसे आहे ते ही आपणास दाखल नाही. नारासुंदर याचा हवाला पुलिया उपरी खुर्दखत ठाणाचे घेतले. ते ही कोणास ठाव नाहीं व आपणांस ही हल्ली वाद सांगतां कळले. रामजी मजकूर गांवास येऊन रखमाजी पानशी, कुलकर्ण चालवावयासी आपण ठेविला होता, त्यास म्हणो लागला जे, महाराज स्वामीचे व ठाण्याचे खुर्दखत घेऊन आलो आहे, कुलकर्ण आपले दुमाले केले आहे. तू आपणास कागद लेहून दे कीं, कुलकर्ण ।