पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्टें. १७३ वडकर याने आपले वडिलास म्हटले जे, तुम्ही रूसोन घरीं राहिला. दिवाण काम चालत नाहीं. पाटलाची व तुमची समजाविसी होय तोंवरी चार दिवस कृष्णाजीस मुतालीक देऊन ठेवणे. त्यावर आपले वडिल मुतालीक करून ठेविला. पाटलाची आमची समजाविसी झाली नाहीं. ऐशामध्ये रंगभट, दत्तभट, राखिया सेकिन सासवड दिव्यास आला होता. त्याने एके घरीं निसरवा घेतला, म्हणून आपल्या चुलत्याने मारिला. त्या दुःखें राखियाने काशीस जाऊन गिधवी याचा वंश त्याची भेट घेऊन त्यास सांगितले की, तुमच्या वडिलाची मिरास मौजे दियेस व सोनोरीस आहे. येऊन चालवाना, हे उचित नाहीं. ऐसे त्यांनी नाना प्रकारे उपदेश करून घेऊन आला. गिधवी यांनी आपले वडिलास पुशिले की, तुम्ही दोहीं गांवींचे कुळकर्ण व जोतिषपणा खातां कशावरून ते सांगणे. त्यांहीं त्या गिधवी याचे दानपत्र लिहून दिल्हें होते व गोही लिहिले होते. पत्र पाहून गोही मनास आणून मागुती आपलीं हीं दानपत्रे करून दिल्हीं असतां, काशीचा वियोग करून आम्हांस घेऊन आला. ऐसे बोलोन ते मागुती काशीस गेलिया उपरी लुखोबा आपला चुलता त्यास देवज्ञा झाली. पाटनाची व आमच्या वडिलाची समजाविशी झाली नव्हती. तैशामध्ये कारकीर्द राघो। निंबाजी मुकसाई कसबे सासवड याचे वेळेस पाडांगळा जेजुरी श्री खंडेराऊ याचा भक्त व राघोजी मंबाजीही खंडेराऊ याचा भक्त याची हकिकत करून उभा राहिला कीं, मौजे दियें व मौजे सोनोरी दोही गांवचे जोतिष कुळकर्ण, आपली मिराशी, गिधवीया आधी आपली मिराशी एसें बोलिला. त्यामध्ये व आपल्या वडिलामध्ये वाद झाला. मग निवाडीयासी श्री अमृतेश्वर मुक्कामीं म्हैसाळे कोंकणांत आहे, तेथे आपला बाप विसाजी परशराम व पाडांगळा गेले, ते जा आपले बायें दिव्य केलें, रवा काढिला. खरा झाला. म्हैसाळ्याचें थळपत्र दिले - घेऊन विसाजी परशराम आला. पाडगळा खेटा झाला. सदरह हकीकत . मंबाजीस सांगितली व रवा काढिला, खरा जाहला, तें थळपत्र दाखविले राघो मंबाजीने पाडांगळा यासी दटाविलें कीं, कईणी आमचा निशा केला की, एकाची मिराशी आपली म्हणोन तुटलासी. ब्राह्मण म्हणोन तुजला सोडिलें. ते वेळेस ऐसा निवाडा झाला. नाईकजी पाटील होता तो मृत्यु पावला. पुढे थोरला दुष्काळ पडला आपला बाप गांव होता. आपण पांच भाऊ व कुटुंब थोर दुष्काळाकरितां पोट भरेना तैशामध्ये आपल्या घरासी आगी लागोन जळाले. त्यामध्ये गिधवी याचे दानपत्राचे कागद होते ते व म्हैसाळां दिव्य केले; तेथील कागदपत्र आपली बिशाद होती । जळाली. आपण व आपले भाऊ लहान लहान होतो. गांवावरी पोट भरेना. मग आपला बाप विसाजी परशराम कारकीर्द महाराज साहेब पुण्यास गेला. ते वेळेस नाईकजी पाटील यांचा लेक हंस पाटील व रत्नोजी पाटील, रामाजी कृष्ण ठाणीयास दिवाण कामाबद्दल आले होते. ते हंस पाटील, रत्ना पाटील आपले बापास बोलिलें