पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ पानसे घराण्याचा इतिहास कईणी (?) कुळकर्णावद्दल भांडण आहे. तरी साहेवी गोविंद विश्वनाथ यास हुजूर आणून आपली व त्याची बर हक मुनसुफी करून निवाडा केला पाहिजे. म्हणून मालूम केले. त्यावरून गोविंद विश्वनाथ यास तलव करून आणून दोघाजणांची हकिकत मनास आणून तकरिरा घेतल्या छ १२ माहे सावान.

  • गोविंद विश्वनाथे तकरीर केली ऐसीजे, गिधवी याची मिरास जोतिष व कुळकर्ण देहे २ तपशील. मौजे दिवे कर्यात सासवड व मौजे सोनारी तर्फ कव्हेपठार परगणे पुणे सदरहु गिधवी याची: मिरासी. गिधवे आपले यजमान परंपरा, आपण त्यांचे उपाध्ये म्हणून गिधवी यांनी आपला मूळ पुरुष लक्ष्मीधर भट पणजा होय त्यासी पाय धुवून दान दिधलें. दानपत्र गोही साक्षीनिशीं स्वहस्ताक्षरें वृत्ति लेकरांचे लेकरी करून दिल्ही. त्यावर कित्येकादिवशी गिधवे काशीस गेले. आपला पणजा लक्ष्मीधर भट लेहूं जाणत असे म्हणोन कुलकर्ण चालवावयासी हरदो गांव मुतालीक ठेविला असे. जोशी-- पण चालवत असे. याचे पोटीं परशराम भट जाहला. तो आपला आजा होय. हा जाणता जाहला यावरी मौजे दिव्याचे कुलकर्ण चालवून असे व परशराम भटाचा भाऊ दुसरा भटपण जाणत असतो. दोही गांवचे जोतिष चालवून असे. व तिसरा भाऊ विठोबा व्यापारास जात असे. याबद्दल सोनोरीस मुतालीक हरकोणी ठेवून चालवीत असे. ती मग विठोबाचा नारोबा जाणता झालीयावरी सोनोरीचे कुलकर्णावर कित्येक दिवशी ठेविला. याउपरी परशराम भट आपला आजा, त्याचे पोटीं आपला वाप विसाजी व चुलते जाहले. हे थोडे बहुत लेंहू शिकले. परंतु लहान लहान असत. मौजे दिव्याचे कुलकर्ण चालवून असत. यावरी आपल्या बापाचा मामा दाणी सासवडकर यांचे शेत मौजे सोनोरीस वोबाडीयाने करीत असे. या शतावरी कृष्णाजी गांवजी खंडेराऊ खटपटीस ठेविला होता. त्यास आमचे वडिलांचे मामाने आमचे आज्याच्या हाती मुतालिक ठेविला. मौजे सोनोरीचे कुलकर्ण चालवावयास जाणते होत, तोंवरी एक दोन वर्षे चालविणे, व शेताच खटपट जैसी करतात तैशी करणे. हे जाणते झाल्यावर आपले कुलकर्ण चालवितील, म्हणून ठेविला होता. त्यावरी आपला बाप व चुलता हे लेहो शिकले, जाणते जाहले. मग कृष्णाजीस दूर करून दोन्ही गांवचे कुलकर्ण आपण चालवू लागले. ऐसे असतां कित्येक दिवशी, नाईकजी पाटील मोकदम मौजे मजकूर कुळकर्णाचा मुशाहिरा मागता मोकदमामध्यें व लुखोवा आपला चुलता यामध्ये कटकट जाली. यावरी मोकदमें लुखाबास मारिलें. याबद्दल आपले वडील रूसोन माराच्या भेगे राहिले. पुढे नाईकजी पाटील याने कृष्णाजी गाऊजीस बोलावून कुळकर्णाचे लिहिणे लिहूं लागल्यावरी, आपले वडिलीं कृष्णाजीस म्हटले की, आपण रूसोन राहिलो आहों, आणि तू मौजे मजकुरास जाऊन कुळकर्णाचे लिहिणे चालवितोस ते चालवू नको. यावरी कृष्णाजी सासवडास उगाच राहिला. कुळकर्णाचे कामाचा बोभाटा पडू लागला. याबद्दल आपले बापाचा मामा दाणी सास