पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्टें. परिशिष्ट पहिलें. --- -- - - सोनोरी व दिवे येथील वतनासंबंधी पत्रे. सुरू सन इसने बैन. खंडो शिवदेव उपनांव पानसे गोत्र मुद्गल सूत्र अश्वलायन, ज्योतिषी व कुलकण मौजे दिवे कर्यात सासवड व मौजे सोनोरी तर्फ कहेंपठार प्रांत पुणे सरकार जुन्नर यांसी दिल्हें वतन-पत्र ऐसें जें, तुम्ही शाहुनगर नजीक किल्ले सातारा येथील मुक्कामीं स्वामीसन्निध विनंती केली. हरदो गांवची सदरहू दोनी वतने पूर्वी गिधवी यांची होती. त्यांनी आपल्या वडिलांस दान देऊन दानपत्र करून दिल्हे. त्यावरून वतन अनुभवू लागले. त्यास मौजे सोनोरी येथील कुलकर्ण चालवावयासी कृष्णाजी शाजी उपनाम गांवखंडेराऊ मुतालिक ठेविला होता. त्याचा लेक रामाजी कृष्ण आपला आजा गोविंद विश्वनाथ यांसी कुळकर्णाबद्दल कजिया करू लागला. याजकरितां महाराज राजश्री थोरले कैलासवासी स्वामीसन्निध किल्ले राजगड मुक्कामी जाऊन वर्तमान निवेदन केले. त्यावरून रामजीस हुजुरून आणून हरदो जणाचे करीने मनाया आणिले, आणि मौजे मोहुरी बुद्रुक तर्फ गुंजण मावळ प्रांत मावळ येथे दिव्य दिल्हे. तेथे दोघांनी ही दिव्ये केली. रामाजी कृष्ण दिव्य-मुखें खोटा जहाला, - अजीजखत लेहून दिल्हे. ते महाराज स्वामींनी मनास आणून दुमाल पवें त्याप्रमाणे वतन अनुभवत आहो. परंतु पत्रे जीर्ण झाली, भोगवटी यास पत्रे पाहिजेत. , याजकरितां महाराजांहीं कृपाळू होऊन नूतन पत्रे करून देऊन वंशप पाहिजे. म्हणून विदित करून महाराज राजश्री थोरले कैलासवासी स्वामींचे पत्र व गिधवी यांचे दान-पत्र व रामाजी गांवखंडेराऊ याचे अजीजपत्र व थळपत्र ऐसीं चार पत्रे आणून दाखविली. पत्रे बितपशीलः महाराज कैलासवासी यांचे पत्र दिल्हे. * अजरख्तवराने राजश्री शिवाजी राजे साहेव दामदौलत हू बजानेबू मोकदमानी व रयानी समस्त प्रजा मौजे सोनोरी परगणे पुणे बिदानद सुरूसन तिसा सितैन अलफ. गोविंद विश्वनाथ पानशी जोतिषी व कुळकण मौजे मजकूर यासी व रामाजी कृष्ण गांवखंडेराऊ वस्ती कसबे सासवड यासी कुळकर्णाबद्दल भांडण लागले होते. त्याचा निवाडा होऊन महजर झाला ऐसाजे. रामजी कृष्ण गांवखंडेराऊ हुजूर येऊन मालूम केलें जे, आपलें कुळकर्ण मौजे सोनोरी तर्फ कहेपठार परगणे पुणे आपली मिरास आहे. यांनी गोविंद पानशी आपणास