पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७० पानसे घराण्याचा इतिहास. लक्ष्मण, यांस विनायक, गणपत व मोरोपंत अशी तीन मुले झाली. विनायक यांचे पुत्र कृष्णाजीपंत हे हल्ली पुणे येथे ( फरसी, सिमेंट व चुन्याचे व्यापारी ) यांजकडे नोकर आहेत. गणपतरावांचे पुत्र चिंतामण हे इरिगेशन खात्यांत ओव्हरसीअर आहेत, वाठार नांवाची गांवें दोन आहेत. निरा नदीचे उत्तर वाजूस वसलेल्या वाठारास पंताचें वाठार म्हणतात; हैं भोर संस्थानांत आहे. दक्षिण भागी सातारा जिल्ह्यांतील वाठारास वाठार बुद्रुक अगर चोराचे वाठार म्हणतात. पंताचे वाठार या गांवों ब्राह्मण-वस्ति नाहीं. पानसे हे वाठार बुद्रुक गांवीं रहातात ७. भोळीकर पानसे । ( दादाजी तानाजीचा वंश ) | दादाजीस कृ ष्णाजी, निराजी व जनार्दन असे तीन पुत्र झाले. त्यांपैकी वडील कृष्णाजी याचा वंश वाढला, निराजी व जनार्दन यांचा वंश संतति न झाल्यामुळे नष्ट झाला. कृष्णाजीस सखाराम व राघोपंत या नांवाचे दोन मुलगे होते. राघोपंत यांचा वंश पुढे संतति नसल्यामुळे खुटला; सखाराम यास दामाजी, नारो. पंत, गंगाधर व रावजी अशी चार मुले झाली. दामाजीचा मुलगा काशिनाथ हा हयात असून पुणे येथे छापखान्यांत म्यानेजरचे काम करीत आहे. नारोपंत यांचे पुत्र कृष्णाजी हयात असून, त्यांची नारायण व वसंत ही दोन मुले हल्ली शिक्षण घेत आहेत. गंगाधर यांचे नक्कल झाले. रावजी यांस गोविंद, दाजी, हर, दादा व रंगपंत असे पांच पुत्र झाले. पैकी गोविंद, दाजी व रंगोपंत यांस संतति झाली नाहीं. हरि यांचे पुत्र पांडुरंग सांप्रत हयात असून भोळीस शेतीवाडी करून राहत ।त. दादा यांचे पुत्र दिगंबर हे आपले वडिलजित इप्टेटीची व्यवस्था पहातात. । उत्तरार्ध समाप्त.

= ===