पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६९ प्रकरण बारावे. नेऊन त्यांचे मुलास शिक्षण दिले. मग तिकडे च त्यांना नोक-या मिळवून देऊन घरदार करून कायमंचे स्थाईक केले. ६. वाठारकर पानसे. ( सखोजी तानाजीचा वंश) सखोजीस पुत्र बाबूराव यांनी वाठारगांवीं राहण्यासाठी वाडा बांधला ( पान '१२४ पाहा ). हा वाडा किल्लयावजा असून त्यासभोंवतीं चिरेबंदी दगडाचा सुमारे चार हात रुंदीचा व १०।१२ हात उंचीचा तट आहे. बाबूराव हे शिंदे सरकारचे लष्करांत नोकर होते व त्यांस तेथे पंचवीस स्वारांची असामी होती. वाबूराव यांस गोविंद, भगवंत, माणको, जिवाजी व मल्हार असे पांच पुत्र होते. गोविंदपंत यांना नालखी पालखीचा मान होता. असा उल्लेख आढळतो. तो मान त्यांना कोणाकडून काय कारणाने मिळाली याची माहिती मिळत नाही, परंतु जुन्या नालख्या पालख्या आज मोडक्या स्थितीत घरांत पडलेल्या आहेत, शिवाय हे पानपतच्या लढाईत होते व तेथून परत आले असा हि उल्लेख आढळतो. यावरून वरील गोष्टीची सत्यता पटते. गोविंदपंतांचे पुत्र कोंडोपंत, यांस चार मुले झाली. पैकी द्वितीय भिकाजीपंत व तृतीय विष्णुपंत यांचा वंश हल्लीं हयात आहे. भिकाजीपंतांस सीताराम, गोविंद, माधव व श्रीधर अशी चार मुले झाली. कल्याण शेटजी म्हणून मुंबईचे एक प्रसिद्ध कंत्राटदार होते. या कॉन्ट्रॅक्टरचे भुसावळ ते खांडवा रेल्वे लाईनचे काम सुरू असतां त्या कामावर सीताराम व गोविंद हे नोकर होते. गोविंदरावास भगवंत, सखाराम व अनंत अशी तीन मुले झाली. भगवंतराव हे हल्ली पुणे जिल्ह्यांतील निरा कॅनॉलकडे ओव्हरसीअर आहेत. यांनी पुणे येथे स्वतांचे राहाण्यासाठी घर बांधले आहे ( सदाशिव पेठ घ. नं. ३२५ ), सखाराम व अनंत हे रेल्वेकडे नोकर आहेत. भिकाजी कांडो यांचे कनिष्ठ पुत्र श्रीधर हे सव्हें डिपार्टमेंटमध्ये नोकर होते. ते पुढे जनरल ड्यूटी सरकल इन्स्पेक्टर झाले होते. ते हल्ली पुण्यास पेन्शनर म्हणून रहात आहेत. यांस तीन मुलगे, आण्णा, मधु व दिनकर असे आहेत आण्णा हे खानदेशांत रेव्हेन्यु खात्यांत नोकर आहेत. मधुकर हे B. A. असून पणे ये कॅप एज्युकेशन सोसायटीत शिक्षक आहेत. दिनकर दिवाणी कोर्टात क्लार्क आरे बाबूराव सखाजीचे द्वितीय पुत्र भगवंत व त्याचे पणतू विश्वनाथ यास भास्कर .. नांवाचे पत्र होते. ते बारामती येथे वकिलाचे कारकून होते. हे नुकते चार पुत्र, पैकी गोविंदराव हे हल्ली फग्र्युसन कॉलेजमध्ये B. A. चे क्लासांत शिक्षण घेत आहेत. बाबूराव सखाजीचे पणतू पांडुरंग यांचे नातू लक्ष्मणराव हे हल्लीं वाठार गांवचे तलाठी आहेत. लक्ष्मणराव यांस धोंडोपंत नांवाचा पुत्र आहे. धोंडोपंतास