पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण बारावें. १६७ मुले विनायक, नारायण व नरहरि अशी होती. या मुलांचे शिक्षण त्यांच्या वडिलांचे खास देखरेखीखाली पुण्यास झाले. विनायकराव हे ओव्हरसियरचे परीक्षेत पास झाल्यावर इंजिनीयर खात्यांत नोकर झाले. पुढे वाढत वाढत ते सव इंजिनीयर झाले होते. नुकतेच त्यांनी पेनशन घेतले. यांस दोन पुत्र माधवराव व गोविंदराव हे आहेत. माधवराव हे B.A. झाले असून हल्ली अमदाबादेस मिलमध्ये देखरेख करीत असतात. गोविंदराव हे B. E. असून सातारा जिल्ह्यांत असिस्टंट एंजिनियर आहेत. नारायणराव सखाराम, हे पुणे येथे प्रोफेसर पानसे या नावाने प्रसिद्ध आहेत. यांनी मॅट्रिकचे परीक्षेत जगन्नाथ शंकरशेट यांची स्कॉलरशिप मिळविली. पुढे डेक्कन कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन इ. स. १८९० साली हे B. A. झाले. हेच पहिले पानसे घराण्यांतील B. A. होत. यांचा शिक्षणाकडे जास्त ओढा असल्यामुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीत लाईफ मेंबर होऊन यांनी फरग्युसनकॉलेजमध्ये संस्कृत भाषेच्या प्रोफेसरीचे काम पतकरले. तेथे बावीस वर्षे काम करून, इ. स. १९१४ साली ते रिटायर झाले. हल्ली त्यांस सोसायटीकडून पेनशन मिळत आहे. युनिव्हरसिटींत संस्कृत विषयाचे हे १०।१२ वर्षे एक्झामिनर होते. अलीकडे त्यांनी आपल्या पुढील पिढीस पुढे सरकण्यास जागा मिळावी म्हणून परीक्षकाचे काम सोडले. ग्वालेर दरबारकडून त्यांच्या दक्षिणेतील इष्टेटीची व्यवस्था पाहण्याकरिता दरबारने नारायणराव यांस वकील नेमलें आहे. हे फार मेहनती आणि कामाचे हौसी आहेत. हे फीमेल हायस्कूलमध्ये ऑनररी सेक्रेटरीचे काम पहात असून, हिंगणे येथील कर्वे महिला युनिव्हरसिटीचे ते सिनेटर आहेत. हे समाजसुधारक असून आपले समाजांत अंधश्रद्धेने घातक असलेल्या रूढि नाहीशा व्हाव्या अशा मताचे आहेत. इ. स. १८९१ सालीं पंचहौद मिशनमध्ये चहा घेतल्याबद्दल बेचाळीस इसमांवर जे काहूर माजले होते त्यांत नारायणराव हे एक होते. या झालेल्या चहापानकृत्यास शास्त्रांत प्रायश्चित्त नाही, परंतु शंकराचार्यांनी प्रायश्चित्त घेतल्यास शुद्धीकरण होते असा निर्णय दिला. नारायणरावांनी या वेळीं शंकराचार्यांकडून सवलत मिळविली. जे शास्त्राने अशक्य ते शक्य झालें, सबव आपणही आतां जास्त हट्ट न धरतां प्रायश्चित्त घ्यावे, असे ठरवून त्याप्रमाणे ते त्यांनी घेतले. यांना सहा मुली व एक शरश्चंद्र नांवाचा मुलगा आहे. मुलगा लहान असून प्राथमिक शिक्षण घेत आहे. यांच्या कन्येपैकीं वडील वारूबाई ही कॉलेजमध्ये इंटर पास झाली असून तिचा विवाह बॅरिष्टर विश्वनाथ गणेश दाणी सासवडकर यांच्या बरोबर झाला. दुसरी कन्या वेणूबाई या इ. स. १९२६ सालीं M. A. व १९२७ साली B. T. चे परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. हल्ली त्या अविवाहित असून फीमेल हायस्कूलमध्ये शिक्षकाचे काम करीत आहेत. तिसरी कन्या यमुताई यांचे इंटरपर्यंत शिक्षण झाल्यानंतर यांचा विवाह नागपूरचे गोविंदराव वझर B. Ag. ( अमेरिका ) यांच्यांशी १९२७ सालांत झाला. चतुर्थ कन्या नलिनीवाई, या हल्लीं फरग्युसन कॉलेजांत प्रिव्हियस क्लास मध्ये आहेत. पांचवी