पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६८ पानसे घराण्याचा इतिहास. कन्या इंदुताई या गेल्यावर्षी मॅट्रिकचे परीक्षेत पास होऊन त्यांत त्यांनी संस्कृत स्कॉलरशिप मिळविली. यांची सर्वांत लहान कन्या अद्याप अज्ञान आहे. नारायणराव हे स्त्रीशिक्षणाचे किती प्रेमी व अभिमान आहेत, हे याजवरून दिसून येईल. नरहर सखाराम हे नागपुराकडे कंत्राटदार आहेत. | रावजा बाळाजी यास दामोदर व वळवंत असे दोन पुत्र झाले. दामोदरपंत हे वकिलीची परीक्षा पास होऊन पुणे जिल्ह्यांत खेड येथे वकिली करीत होते, त्यांस अकालीच मृत्यूने गांठिले. त्यांस संतति झाली नाहीं. ५, कृष्णाजी परशुराम यांचा वंश. परशुराम लक्ष्मीधर यांचे कृष्णाजी हे चतुर्थ पुत्र होत. यांचे पुत्र चिमणाजी यास, लक्ष्मण या नांवाचे पुत्र होते. लक्ष्मण यास मल्हार व मल्हार यास चिमणाजी, लक्ष्मण, रखमाजी, कृष्णाजी व परशुराम असे पांच पुत्रं झाले. चिमणाजी, लक्ष्मण व परशुराम या भावांचे वंशांत कोणी हयात पुरुष राहिला नाहीं. रखमाजी यांचे वंशांतील पुरुष सांप्रत कोठे आहेत त्याचा तपास लागत नाहीं. कृष्णाजसि मल्हारी या नांवाचे पुत्र होते व मल्हारीस पांडुरंग, परशुराम व कृष्णाजी असे तीन पुत्र झाले. पांडुरंग यास रामचंद्र. माधव, केशव, नारायण व रघुनाथ हे पांच पुत्र झाले. रामचंद्र यांचे चिरंजीव धोंडोपंत हे ट्रेनिंगकॉलेजांत दुसरे वर्षाचे परीक्षेत पास झाले. हल्ली ते पुणे जिल्ह्यांत लोकलबोर्डीतील शाळेवर हेडमास्तर आहेत. माधवराव यास पुत्र दोन. गणेश व बापू. गणेश हे हल्ली गाईकवाडीत रेव्हेन्यु खात्यांत नोकर आहेत, व वापू कोठे आहेत त्यांचा तपास लागत नाहीं. केशव पांडुरंग यांच्या विनायक नांवाच्या पुत्रास नथुराव व बावुरावं अशी दोन मुले आहेत. ती बडोदा स्टेटमध्ये नोकर आहेत. परशुराम मल्हार यास महिपत व गोविंद असे दोन पुत्र होते. महिपत यास दिगंबर व गोविंद. गोविंद यास गजानन व कृष्णा या नांवाची मुले झाली, ती हल्लीं गाइकवाडीत नोकर आहेत. कृष्णाजी मल्हार हे लहानपणी च आपले दिवे गांव सोडून बडोद्यास नोकरी मिळविण्याचे उद्देशाने गेले. तेथे त्यांनी नोकरी मिळविली. वाढत वाढत त्यांनी श्री. खंडेराव महाराज यांचे कारकीर्दीत खुद्द दरवारांत मोठ्या सन्मानाची जागा मिळविली. यांचा सल्ला नेहमीं पोक्त व अचल असल्यामुळे यांस मुत्सद्दी असे म्हणत व कागदपत्रांत हि यांचे नांवामागे * मुत्सद्दी ' हा बहुमानार्थी शब्द त्या वेळी लावीत असत. पुढे श्री. सयाजीराव महाराज हे अज्ञान असतां राज्याचा कारभार सर. टी माधवराव यांचेकडे असतांना त्यांनी या जागा कमी केल्या. त्यांत कृष्णाजीची जागा कमी होऊन त्यांस घरी बसावे लागले. यांस संतति झाली नाही. यांनी आपल्या बंधूस वडोदे येथे