पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६६ पानसे घराण्याचा इतिहास. - णूक असिस्टंट कलेक्टरचे जागेवर झाली. ते काम त्यांनी बारा वर्षे केले. पुढे विजापूर, भडोच, कारवार वगैरे जिल्ह्यांत कलेक्टरचे काम केल्यावर इ. स. १९१० साली यांनी पेनशन घेतले. यांचे नांव फर्स्ट क्लास सरदार-पटांत दाखल झाले होते. सरकारी नोकरीत असतां मुंबई इलाख्याच्या लेजिस्लेटिव्ह कॉन्सिलमध्ये दक्षिणेतील सरदारातर्फे प्रतिनिधि म्हणून निवडणुकीस उभे राहण्याची यास सरकाराने परवानगी दिली; व त्या निवडणुकीत ते यशस्वी झाले. कौन्सिलांत असतां यांनी उत्तम प्रकारे कामागिरी वजाविली. यास पुत्र संतति नसल्याकारणाने हेवळीकर यांचे घराण्यांतील मुलगा यांनी दत्तक घेतला. त्याचे नांव दामोदरराव असें ठेविलें. दामादरराव हे येथील शिक्षण पुरे केल्यावर बॅरिस्टर होण्यासाठी विलायतेस गेले. परंतु तेथील हवा न मानवल्यामुळे परत आले. यांचे नांव यांचे वडिलांचे पश्चात् सरदार-पटांत दाखल होते. हे अकालीच वारले. यास तान पुत्र असून ते हल्ली अज्ञान आहेत. सबब इटेटीची व्यवस्था व मुलांच्या विद्याभ्यासाची सोय कोई ऑफ वार्ड पाहात असते. सखाजी माणको यांच्या वंशांपैकी सांप्रत कोण पुरुष हयात व ते कोठे राहतात याचा तपास लागत नाहीं. संभाजी माणको यास दोन पुत्र. सुर व परशुराम. मुरार यांचे पणतु हरिपंत हे होत. यास अनंत नांवाचा मुलगा होता. अनंतराव यांना संतति न झाल्यामुळे त्यांनी गंगाधरपंत यास दत्तक घेतले. गंगाधरपंत हल्ली मुंबईस ट्राम कंपनीकडे नोकर आहेत. परशुराम संभाजी हे शिरवळजवळ तोंडल या गावी जाऊन स्थाईक झाले. त्यांना गणपतराव, गोपाळ व भगवंत अशी तीन मुले झाली. गणपतरावाच्या वंशाचे पुढे नक्कल झाले. गोपाळ यास यशवंत व यशवंत यास नोरोपंत या नांवांचे पुत्र झाले. नारोपंतास तीन मुले झाली. मधील गणपतराव यांस बळवंतराव नांवाचे पुत्र असून ते हल्ली तलाठी आहेत. धाकटे हरिपंत यास दत्तात्रय व विनायकराव हे दोन मुलगे असून सांप्रत आपल्या गांवीं राहून शेतीभाती करतात. गोविंद विसाजी यांचे वंशांतील कोणीही पुरुष आज हयात नाहीं. उद्धव माणको यास रोपाळपंत हे पुत्र होते. गोपाळपतास गोविंदपंत या नांवाचे पुत्र होते. गोविंदपंतास त्र्यंबक व त्र्यंबकास वाळाजी हे पुत्र होते. बाळाजीस तीन पुत्र सखाराम, बापूजी व रावज असे झाले. बापूजी हे पहिल्याने मुधोळकर घोरपडे यांचे पदरी त्यांचे वकील या नात्याने पुणे प्रांतांत त्यांच्या असलेल्या इष्टेटीवर देखरेख करीत असत. त्यांच्या मृत्यूनंतर ती जागा त्यांचे वडील बंधु सखारामपंत यांस मिळाली. ही जागा पुढे अजीबात कमी झाली. याचवेळी होळकर दरबारास त्यांच्या दक्षिणेत असलेल्या उत्पन्नावर देखरेखीकरितां एका अनुभव वाके लाची जरूरी होती व तशा मनुष्याच्या तपासांत असतां त्यांनी ती जागा सखारामपत यांस दिली; ती त्यांचेकडे त्यांच्या हयातीपर्यंत चालू होती. सखारामपंतास तीन