पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण बारावे. १६५ क्वचित् दिसत असत. त्याकाळी तुटपुंजे ही इंग्रजी शिक्षण घेणारास मामलतदारीसारख्या मोठ्या हुद्याच्या जागा मिळत असत. शंकरराव यांचे इंग्रजी शिक्षण वरेंच म्हणजे सातवे इयत्तेपर्यंत झाले होते. त्यांत त्यांचा इंग्रजी विषय चांगला असून सरदार-घराण्यांत यांचा जन्म झाला असल्यामुळे मामलतदारीची जागा पतकरण्याविषयी अधिकारी लोकांनी त्यास आग्रह केला असल्यास नवल नाही. परंतु नोकरी करणे हे कमी दर्जाचे समजून व शिवाय साधारण मनुष्यासही मामलतदारी मिळते, तेव्हां निदान हुजूर डेप्युटीकलेक्टरची जागा दिल्यास पत्करावी अशी त्यांची इच्छा होती. या कामी त्यांनी प्रयत्न केला असता तर कदाचित त्यावेळी त्यांचे साधले असते. परंतु तो तसा प्रयत्न त्यांनी केला नाहीं, व करण्याची त्यावेळी त्यांना जरूरही नव्हती. यांस एक गोपाळराव नांवाचे पुत्र असून ते हल्ली पुण्यांत आपले घरी ( शुक्रवार पेठ घ. नं. २०२ ) राहून इष्टेटीची देखरेख करतात. | सखारामपंत हे यशवंतराव लक्ष्मण यांचे तृतीय पुत्र होत. यास यशवंतराव या नांवाचा एक पुत्र होता. यशवंतराव यास पुत्र न झाल्यामुळे त्यांनी संभाजी माणको यांचे वंशांतील वामनराव यास दत्तक घेतले. वामनराव यास यशवंतराव, रंगराव, सिताराम व गणपतराव असे चार पुत्र झाले. यशवंतराव हे फार सात्विक व धर्मशील होते. यांचे नांव सरदार-पटांत दुसरे क्लासांत दाखल होते. यांस संतति न झाल्यामुळे यांनी आपला पुतण्या वामनराव यास दत्तक घेतले. वामनराव हल्लीं सर्व कारभार पाहात आहेत. वामनराव यांनी आपले वडिलांचे जागी सरदार–पटांत नांव दाखल करून घेण्याची खटपट करावी अशी आमची त्यांस आग्रहाची विनात आहे. सीताराम वामन यास कृष्णराव, वामनराव, गोपाळराव, नारायणराव व भिवराव असे पांच पुत्र झाले. कृष्णराव हे हल्ली पुणे जिल्ह्यांत दिवाणी कोर्टात क्लार्क आहेत. गोपाळराव हे रेव्हेन्युखात्यांत कारकून आहेत. नारायणराव हे अकाली मृत्यु पावले. भिवराव हे गांवीं राहून उत्पन्नाची देखरेख करीत असतात. विश्वासराव यशवंत-सरदार पानसे अगर कलेक्टर पानसे म्हणून पुण्यास प्रसिद्ध असलेले पानसे घराणे हें विश्वासरावाच्या वंशांतील होय. यांचा वाडा शुक्रवार पेठेत ( घ. नं. ३७६ ) आहे. विश्वासरावाचे पुत्र गणपतराव हे पेशवाई अखेरपर्यंत इंग्रजांचे बरोवर पेशव्यांचे बाजूने लढत होते. यास संतति झाली नाही, म्हणून यांना उडपी घराण्यांतील मुलगा दत्तक घेतला व त्याचे नांव दामोदरराव असें ठेविले. यांनी आपल्या उतार वयांत चतुर्थाश्रम घेतला होता. दामोदरराव यास गणपतरात या नांवाचा मुलगा झाला. गणपतराव यांचा जन्म इ. स. १८५९ त झाला. पुणे येथील प्रसिद्ध बाबा गोखले यांचे शाळेत मॅटिकची परीक्षा पास झाल्यावर इ. स. १८८१ साली यांची नेम