पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ १६४ पानसे घराण्याचा इतिहास. त्यांस गांठिले. दिगंबर पंतास एक विश्वंभर या नांवाचा मुलगा असून तो हल्ली दापोडी येथे सरकारी वर्कशॉपमध्ये क्लार्क आहे. बळवंतरावाचे तृतीय पुत्र रघुनाथ यांनीं भोर संस्थानांत व सोलापूर म्युनिसिपालिटींत ओव्हरसियरची कामे केली, परंतु वडिलार्जित व्यवस्था पहाण्यास कोणी नसल्यामुळे हल्ली सोनेरीस येऊन ते आपल्या इष्टेटीची देखरेख पाहात असतात. श्रीपतराव कृष्ण-कृष्णराव माधवरावाचे हे कनिष्ट चिरंजीव यांस संतती न झाल्या मुळे यांनी माधवराव कृष्ण यांचे कनिष्ठ पुत्र दामादरराव यास दत्तक घेतले होते. यांचा स्वभाव फार आनंदी असे. यांना मरतेसमयीं चतुर्थाश्रम धारण केला होता. यांचे शेतीकडे फार लक्ष होते.यांनी आपली शेती, डोंगराचे पायथ्याशी, माळरानांतली व हलक्या प्रतीची असूनही फार मेहनतीने, पैसा खर्च करून व ताली घालून सुपीक केली. त्याचा उपयोग आज त्यांचे नातू, पणतू आनंदाने घेत आहेत. दामोदरराव यांना श्रीपतराव, कृष्णराव, चिंतामणराव व रंगराव असे चार पुत्र झाले. श्रीपतरावास गणपतराव या नांवाचे पुत्र असून हल्ली ते सातारा जिल्ह्यांत देवी काढण्याचे खात्यांत इन्स्पेक्टर आहेत. कृष्णराव यास सहा पुत्र. वडील माधवराव हे पुणे जिल्ह्यांत इंजिनियर खात्यांत ओव्हरासयर आहेत. दुसरे जनार्दन हे रेव्हेन्युखात्यांत नोकर होते. ते आज हयात नाहीत. तिसरे वामनराव हे इंजिनीयर खात्यांत मिस्त्री आहेत. चवथे विष्णुपंत हे पुणे मुक्कामी वैद्यकी व चष्म्याचा व्यापार करतात. पांचवे गंगाधर हे दत्तक दिले. सहावे म्हणजे सर्वांत धाकटे नारायणराव हे एल्. सी. पी एस परीक्षा पास होऊन हल्ला स्वताचा दवाखाना काढून सोलापूर येथे रहात आहेत. पानसे घराण्यांत हेच पहिले एल्. सी. पी. एस. डाक्तर होत. दामोदरराव यांचे तृतीय पुत्र चिंतामणराव यांनी पुणे जिल्ह्यांत लोकलबाडमध्ये मराठी शाळेत हेडमास्तरचे काम करून पेनशन घेतले. ते पुण्यास बि-हाड करून राहिले आहेत. यास बाबूराव या नांवाचा एक मुलगा असून, तो पुणे म्युनिसिपालिटीत आकाऊंटंट खात्यांत नोकर आहे. दामादररावाचे सर्वात धाकटे पुत्र रंगराव हे पुणे जिल्ह्यांत लोकलमध्ये ओव्हरसियरचे काम करीत होते. यास अकाली मृत्यु आला. यास तीन पुत्र आहेत. पैकीं वडील पुत्र भगवान हे रेलवेकडे नेाकर आहेत. यशवंतराव लक्ष्मण यांस पांच पुत्र झाले. हे सर्व तोफखान्याकडे नोकर असल्यामुळे त्यांची वर्णने मागे आलीच आहेत. गोपाळराव जयवंत यांस पुत्र. संतति नव्हती म्हणून त्यांनी कृष्णराव माधवचे द्वितीय चरंजीव नारायणराव यास दत्तक घेतले. नारायणरावही निपुत्रिकच असल्यामुळे त्यांनी बापूराव कृष्ण यांचे चिरंजीव शंकरराव यांस दत्तक घेतले. पानसे घराण्यांत पहिल्याने इंग्रजी शिक्षण घेण्यास शंकरराव यांनी सुरवात केली. इंग्रजी शिक्षणाने मनुष्य ख्रिस्ती बनतो, यामुळे ते त्याज्य अशी त्यावेळी जनतेची समजूत होती. दोन चार बुकें इंग्रजी शिकलेली मंडळी या वेळी